शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘वडाप’वर आजपासून कारवाईचा बडगा

By admin | Updated: April 7, 2017 00:25 IST

प्रादेशिक परिवहन अधिकारी : महापालिकेच्या शिष्टमंडळाला दिले आश्वासन; चार पथके तयार; रिक्षा करणार जप्त

कोल्हापूर : शहरातील अवैध प्रवासी वाहतुकीस आळा घालण्यासाठी चार फिरती पथके तयार करण्यात आली असून, आज, शुक्रवारपासून प्रत्यक्ष कारवाईला प्रारंभ होईल, असे आश्वासन प्रादेशिक परिवहन अधिकारी डी. टी. पवार यांनी गुरुवारी महानगरपालिकेच्या शिष्टमंडळाला दिले. अवैध वाहतूक करणारी वाहने जप्त करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. जर येत्या पंधरा दिवसांत अवैध प्रवासी वाहतूक रोखली नाही, तर मात्र आम्ही स्वत: रस्त्यांवर उतरून कारवाई करू, असा इशारा महानगरपालिकेच्या पदाधिकारी, नगरसेवकांनी दिला. कोल्हापूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून अवैध प्रवासी वाहतूक (वडाप) मोठ्या प्रमाणात सुरूआहे. तसेच शहर हद्दीत परवाना नसतानाही सहा आसनी रिक्षा वाहतूक सुरूआहे. त्यामुळे या दोन्ही अवैध प्रवासी वाहतुकीवर तातडीने कारवाई करावी आणि केएमटी वाचवावी, अशी मागणी करण्यासाठी महानगरपालिकेचे उपमहापौर अर्जुन माने, स्थायी सभापती संदीप नेजदार, परिवहन सभापती नियाज खान, विरोधी पक्षनेता किरण शिराळे, गटनेता शारंगधर देशमुख, सत्यजित कदम, नगरसेवक तौफिक मुल्लाणी, विजय खाडे, अभिजित चव्हाण, अशोक जाधव, प्रताप जाधव, सूरमंजिरी लाटकर, उमा बनसोडे, शोभा कवाळे, माधुरी लाड, प्रभारी अतिरिक्त वाहतूक व्यवस्थापक संजय भोसले यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने डी. टी. पवार यांची भेट घेतली. यावेळी स्वाभिमानी रिक्षा चालक-मालक संघटनेचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. तीन केएमटी बसमधून हे सर्वजण प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या कार्यालयाजवळ पोहोचले. ‘हटाव हटाव - वडाप हटाव’, ‘वडाप हटाव, केएमटी बचाव’ अशा घोषणा देतच सर्वजण डी. टी. पवार यांच्या कार्यालयात गेले. त्यावेळी पवार हे त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करीत बसले होते. परिवहन सभापती खान, सत्यजित कदम, शारंगधर देशमुख, अशोक जाधव, सूरमंजिरी लाटकर यांनी शिष्टमंडळ घेऊन येण्याचे कारण सांगितले. शहरात अवैध वाहतूक सुरूअसल्याने केएमटी आर्थिक अडचणीत सापडली आहे. हजारो बेकायदेशीर रिक्षामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे या अवैध प्रवासी वाहतुकीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. अडचणी येऊ नयेत : पवार कारवाई करताना काय अडचणी येतात याचा अनुभव आम्हाला आहे. त्यामुळे कारवाई सुरूझाली की पुन्हा अशा अडचणी येऊ नयेत, अशी अपेक्षा डी. टी. पवार यांनी व्यक्तकेली. आम्ही अशा वडाप रिक्षा वाहतुकीला आळा घालण्याकरिता चार पथके तयार केली असून आज, शुक्रवारपासून ही कारवाई सुरूहोईल. एक पथक कायमस्वरूपी तैनात केले जाईल. सहा आसनी रिक्षा तसेच आयुष्य संपलेल्या रिक्षा जप्त केल्या जातील, तसेच प्रत्येक आठवड्याला आढावा बैठक घेतली जाईल, असेही पवार म्हणाले. फोनवर दम देतात ...प्रादेशिक परिवहन अधिकारी पवार यांनी शिष्टमंडळासोबत चर्चा करताना ‘आम्ही कारवाई सुरूकेली की लगेच फोनवर दम दिला जातो. कारवाईत व्यत्यय आणला जातो. असा अनुभव येणार नाही याची दक्षता आपण सर्वजणांनी घ्यावी’, अशी विनंती केली. आम्ही अवैध प्रवासी वाहतुकीला कधीही पाठीशी घातले नाही; पण फोनवर दम दिल्याने त्यात खंड पडतो, अशी कबुलीही त्यांनी दिली. त्याचवेळी त्यांना रोखत शारंगधर देशमुख यांनी त्यांना अशा कारवाईत आम्ही हस्तक्षेप करणार नाही, उलट आम्ही सोबतच राहू, असे सांगितले. पंधरा दिवसांची मुदत शहरातील वडाप वाहतूक बंद करण्यासाठी नगरसेवकांनी पंधरा दिवसांची मुदत दिली आहे. जर या पंधरा दिवसांत वडाप पूर्णपणे बंद झाले नाही तर मात्र आम्ही सर्व नगरसेवक, केएमटीचे कर्मचारी रस्त्यावर उतरून स्वत: कारवाई करणार, असा इशारा यावेळी देण्यात आला.