शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दूध उत्पादकांच्या जीवनात ‘आनंद’ फुलविणारा ‘गोकुळ’, हिरकमहोत्सवी वर्षाची आज सांगता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 13:45 IST

कोल्हापूर : ‘ गोकुळ’ दुधाचा १६ मार्च, १९६३ ते २०२४ हा दिमाखदार प्रवास असून, जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादक ...

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दुधाचा १६ मार्च, १९६३ ते २०२४ हा दिमाखदार प्रवास असून, जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलविण्याचे काम ‘गोकुळ’ने केले आहे. हिरकमहोत्सवी वर्षाचा आज, शनिवारी दुपारी दोन वाजता अमृतसिद्धी हॉल, कळंबा येथे सांगता समारंभ असून, यावेळी दूध उत्पादकांचा गौरव करण्यात येणार आहे.‘गोकुळ’चे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील - चुयेकर यांच्या अविरथ प्रयत्न आणि एन.टी. सरनाईक यांच्या मिळालेल्या साथीमुळे ‘गोकुळ’चा पाया भक्कम झाला. प्रारंभी १६ मार्च, १९६३ रोजी २२ संस्था आणि ७०० लीटर दूध संकलनावरून संघाचा प्रवास सुरू झाला, तत्कालीन नेतृत्वाने श्वेतक्रांतीचे जनक वर्गीस कुरियन यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचा विस्तार केला. आज, संघाची प्रतिदिनी १७ लाख लीटर दूध हाताळणी क्षमता व दूध पावडर निर्मिती आहे.

दहा दिवसाला ७० कोटी दूध बिलदर दहा दिवसाला ७० कोटींहून अधिक दूध बिल दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणारा ‘गोकुळ’ एकमेव दूध संघ आहे. संघाची वार्षिक उलाढाल साडेतीन हजार कोटी असून, वीस लाख लीटर दूध संकलनाचा टप्पा पार करण्याच्या ध्येयाने संचालक मंडळाचे काम सुरू आहे.

दृष्टिक्षेपात ‘गोकुळ’ दूध संघ -

  • वार्षिक उलाढाल सरासरी - ३,४२८ कोटी
  • अधिकृत भाग भांडवल - १०० कोटी
  • वसूल भाग भांडवल - ६१.६४ कोटी
  • राखीव इतर निधी - ३७०.५७ कोटी
  • गुंतवणूक - २७४.७४ कोटी
  • कायम मालमता - २६३ कोटी
  • निव्वळ नफा ९.१९ कोटी
  • अंतिम दूध दर फरक - १०४ कोटी
  • एकूण दूध संकलन - ४७ कोटी ४४ लाख लीटर
  • प्रतिदिनी सरासरी संकलन - १५ लाख लीटर
  • प्रतिदिनी सरासरी विक्री - १४ लाख लीटर

दूध उत्पादक शेतकरी हा ‘गोकुळ’चा कणा असून, ग्राहकांच्या विश्वासावर आज देशपातळीवर संघाने दबदबा निर्माण केला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी हिताचा कारभार सुरू असून, एकूण उत्पन्नातील ८२ टक्के रकमेचा परतावा देण्याची परंपरा कायम राखली आहे. सर्वांच्या सहकार्यावर लवकरच २० लाख लीटर दुधाचा टप्पा यशस्वीपणे निश्चित पार करू. - अरुण डोंगळे (अध्यक्ष, ‘गोकुळ’)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul Milkगोकुळ