शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

corona virus-टोबॅको सेंटरमधून खुलेआम तंबाखूची विक्री सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 4:42 PM

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंदी आदेश डावलून शहरातील लक्ष्मीपुरी परिसरातील टोबॅको सेंटर उघडी ठेवून जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धाब्यावर बसविण्यात आला आहे. पानपट्ट्या बंद असल्याने ग्राहकांची या दुकानांवर गर्दी वाढत असून, याचा फायदा या टोबॅको सेंटरवाल्यांकडून उचलला जात आहे. जिल्हा प्रशासन यावर काय कारवाई करणार हे पहावे लागणार आहे.

ठळक मुद्देटोबॅको सेंटरमधून खुलेआम तंबाखूची विक्री सुरूजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धाब्यावर

कोल्हापूर : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंदी आदेश डावलून शहरातील लक्ष्मीपुरी परिसरातील टोबॅको सेंटर उघडी ठेवून जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धाब्यावर बसविण्यात आला आहे. पानपट्ट्या बंद असल्याने ग्राहकांची या दुकानांवर गर्दी वाढत असून, याचा फायदा या टोबॅको सेंटरवाल्यांकडून उचलला जात आहे. जिल्हा प्रशासन यावर काय कारवाई करणार हे पहावे लागणार आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ, सुगंधी सुपारी विक्री करणाऱ्या पानपट्टी व दुकाने यांना बंदीचे आदेश दिले होते. त्याची शुक्रवारपासून अंमलबजावणीही सुरू झाली.

पानपट्टीचालकांनी स्वत:हून पानपट्ट्या बंद केल्या. तर काही सुरू असणाऱ्या पानपट्ट्यांवर प्रशासनाकडून कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु लक्ष्मीपुरी येथील होलसेल दराने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ होलसेल दरात विक्री करणारी दुकाने सुरूच राहिली.शनिवारीही हेच चित्र होते. एका बाजूला पानपट्ट्या बंद झाल्याने याचा फायदा नाष्टा सेंटर व किरकोळ दुकानदारांनी घेतला. त्यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू ठेवली. त्याचबरोबर टोबॅको सेंटरही खुली असल्याने पानपट्ट्यांचे ग्राहक तिकडे वळाले.

त्यामुळे या दुकानांसमोर खरेदीसाठी गर्दी दिसत होती. यावरून आम्ही कोणालाही जुमानत नाही, असा पवित्रा घेत होलसेल दुकानदारांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्याच आदेशाला आव्हान दिले आहे. पानपट्ट्या उघड्या ठेवल्या म्हणून कारवाई करत थेट गुन्हे दाखल करणाऱ्या अन्न व औषध प्रशासन यंत्रणेला ही होलसेल दुकाने दिसत नाहीत का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी