कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज टर्मिनस येथून तिरूपतीला जाणाऱ्या एक्स्प्रेसच्या ए१ या डब्यातील खिडकीच्या काचा रेल्वेच्या सेक्शन इंजिनिअरनेच फोडल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. ऑफिसमधील रागातून हा प्रकार घडल्याचे समजते. याबाबत रेल्वेपोलिसांकडे तक्रार दाखल झाली आहे.मुंबईहून आलेली महालक्ष्मी एक्स्प्रेस पुढे तिरूपतीला जाते. आठवड्यापूर्वी स्वच्छतेसाठी यार्डात लावलेल्या गाडीची पाहणी अधिकाऱ्यांकडून सुरू होती. त्यावेळी एका सेक्शन इंजिनिअरने रागाच्या भरात हातोडीने ए१ या डब्यातील १४ खिडक्यांच्या काचा फोडल्या.त्यानंतर पळून जाताना पाय घसरून पडल्याने तो जखमी झाला. याबाबत रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल झाली आहे. तोडफोड करणाऱ्या इंजिनिअरवर कडक कारवाई करण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात आहे.
ऑफिसच्या रागातून तिरूपती एक्स्प्रेस डब्यात तोडफोड; कोल्हापुरात रेल्वेच्या कर्मचाऱ्याचा प्रताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 17:48 IST