शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

ऑनलाईन भरूनही पुन्हा थकीत बिले, महावितरणचा सावळागोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 17:56 IST

महावितरणने केलेल्या आवाहनानुसारच लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन विजेची बिले भरली. कोल्हापूर परिमंडळात २२ हजार ७२८ जणांनी मोबाईलवरून बिल भरले; पण आता त्यांनाही आलेल्या बिलात मागील तीन महिन्यांची थकबाकी दिसत असल्याच्या तक्रारी येत आहेत. ह्यमहावितरणह्णच्या या सावळागोंधळामुळे प्रामाणिकपणे बिल भरणारे वैतागले असून, वेळेत बिल भरून मूर्खपणा केला का, असा संतप्त सवाल करू लागले आहेत.

ठळक मुद्देऑनलाईन भरूनही पुन्हा थकीत बिले, महावितरणचा सावळागोंधळएप्रिलनंतरची बिले वाढीव दराने दिल्याची कबुली

कोल्हापूर : महावितरणने केलेल्या आवाहनानुसारच लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन विजेची बिले भरली. कोल्हापूर परिमंडळात २२ हजार ७२८ जणांनी मोबाईलवरून बिल भरले; पण आता त्यांनाही आलेल्या बिलात मागील तीन महिन्यांची थकबाकी दिसत असल्याच्या तक्रारी येत आहेत. ह्यमहावितरणह्णच्या या सावळागोंधळामुळे प्रामाणिकपणे बिल भरणारे वैतागले असून, वेळेत बिल भरून मूर्खपणा केला का, असा संतप्त सवाल करू लागले आहेत.लॉकडाऊनमुळे वीज मीटर रीडिंग, बिलांची छपाई व वाटप या प्रक्रिया थांबवण्यात आल्या होत्या. १ जूनपासून हे सर्व पूर्ववत झाले असून घरोघरी बिल येऊन पडू लागले आहे. एकदम तीन महिन्यांचे बिल हातात पडल्याने बिलावरील आकडा पाहून ग्राहकांमधून तक्रारी वाढू लागल्या आहेत. वाढीव बिलाबरोबरच ऑनलाईन बिल भरणाऱ्यांनाही पुन्हा बिल आले आहे. या संदर्भात अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी बिले अचूकच दिली आहेत, तरीदेखील काही त्रुटी राहिल्या असल्यास तक्रार द्या, त्वरित सुधारणा करून देऊ असे सांगितले.महावितरणच्या म्हणण्यानुसार ३१ मार्चपर्यंतची बिले ही डिसेंबर ते फेब्रुवारी या हिवाळ्याच्या काळातील आहेत, तर त्यानंतरच्या बिलांचे रीडिंग हे जूनमध्ये घेतल्यानंतर वापर वाढल्याचे दिसल्याने युनिट वाढून सरासरीही जास्त आली आहे; त्यामुळे जास्त बिल आले असल्याचा समज ग्राहकांनी करून घेऊ नये.

रीडिंग न पाठवणाऱ्या आणि सरासरीने बिले न भरणाऱ्या ग्राहकांना अडीच महिन्यांचे एकत्रित दिलेले बिल अचूकच आहे, यावर महावितरण ठाम आहे. शंका असल्यास ऑनलाईन पोर्टलवर जाऊन पडताळणी करावी, असा सल्लाही दिला आहे. दरम्यान, मार्चपर्यंतचे बिल डिसेंबर ते फेब्रुवारीच्या सरासरीवर; तर एप्रिल ते मे महिन्यांतील बिल वाढीव दराने केली असल्यानेच बिलात वाढ दिसत असल्याची कबुलीही महावितरणने दिली आहे.संकेतस्थळावर तपासा बिललॉकडाऊन काळातील बिल तपासण्यासाठी महावितरणने महाडिस्काम हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले असून वीज बिलावरील लिंकवर जाऊन ग्राहक क्रमांक टाकून बिल पडताळून पाहावे. बिलावरील रीडिंग व मीटरवरील रीडिंग पडताळून शंका दूर करावी.स्थिर आकारही वाढलाएक एप्रिलपासून विजेचे नवीन दर लागू झाले आहेत. स्थिर आकारात महापालिकेच्या हद्दीत २०, तर ग्रामीण हद्दीत १० रुपये वाढ झाली आहे. वीज आकारातही १०० युनिटपर्यंत प्रती ४१ पैसे, १०१ ते ३०० युनिटपर्यंत ४७ पैसे इतकी वाढ झाली आहे.प्रतिक्रियालॉकडाऊनमुळे अनेक घटक अडचणीत आले, त्यात महावितरणही आहे. कंपनीला अस्तित्वासाठी कर्ज काढावे लागले आहे. सरकारी कंपनी टिकण्यासाठी वीज ग्राहकांनी बिल भरून सहकार्य करावे.विकास पुरी, जनसंपर्क अधिकारी, महावितरण कोल्हापूर परिमंडल

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर