काच फोडून कारमधील अडीच लाखांचे कॅमेराचे साहित्य चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 16:29 IST2020-04-20T16:28:52+5:302020-04-20T16:29:48+5:30

मार्केड यार्ड येथे एका अलीशान कारची काच फोडून आतील सुमारे २ लाख ५९ हजार १००रुपयांचा कॉमेरा व साहित्य चोरट्यांनी रविवारी नेल्याची फिर्याद रोहित उदयकुमार बडीगेर (रा. न्यू शाहुपूरी) यांनी शाहुपूरी पोलिस ठाण्यात दिली.

Throw glasses and steal two and a half million camera materials in a car | काच फोडून कारमधील अडीच लाखांचे कॅमेराचे साहित्य चोरीस

काच फोडून कारमधील अडीच लाखांचे कॅमेराचे साहित्य चोरीस

ठळक मुद्देकाच फोडून कारमधील अडीच लाखांचे कॅमेराचे साहित्य चोरीसशाहुपूरी पोलिस ठाण्यात फिर्याद

कोल्हापूर : मार्केड यार्ड येथे एका अलीशान कारची काच फोडून आतील सुमारे २ लाख ५९ हजार १००रुपयांचा कॉमेरा व साहित्य चोरट्यांनी रविवारी नेल्याची फिर्याद रोहित उदयकुमार बडीगेर (रा. न्यू शाहुपूरी) यांनी शाहुपूरी पोलिस ठाण्यात दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित बडीगेर हे कोरोना रोगाचे अनुशंगाने स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा कोल्हापूर यांच्याकडे जिह्यातील विविध ठिकाणाचे ड्रोनवरून शुटींग करतात. रोहित बडीगेरे हे सोमवारी दुपारी तीन वाजता मार्केड यार्ड आऊट गेट जवळ आपल्या अलीशान कारमधून कामासाठी आले.

गाडी पार्क करून ड्रोन शुटिंगसाठी गेले असता. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कारची काच फोडून किंमती फोटो कॅमेरा, मेमरी कार्ड व साहित्य असे सुमारे दोन लाख ५९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत त्यांनी शाहुपूरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
 

 

Web Title: Throw glasses and steal two and a half million camera materials in a car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.