शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
2
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
3
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
4
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
5
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
6
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
7
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
8
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
9
Shreyas Iyer Injury Update: अय्यरबाबत जोखीम नको! वनडे मालिकेपूर्वी तब्येतीसंदर्भात मोठा खुलासा
10
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
11
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
12
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
13
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
14
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
15
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
16
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
17
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
18
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
19
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
20
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?

तीन तालुक्यांची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:34 IST

कोल्हापूर : जिल्ह्यातील गगनबावडा, चंदगड, शाहूवाडी या डोंगराळ तालुक्याची वाटचाल अलिकडे कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे. सामाजिक अंतर चांगले ...

कोल्हापूर : जिल्ह्यातील गगनबावडा, चंदगड, शाहूवाडी या डोंगराळ तालुक्याची वाटचाल अलिकडे कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे. सामाजिक अंतर चांगले राहत असल्याने आणि ६० वर्षांवरील लोकांचे लसीकरणाचे प्रमाण चांगले झाल्याने या तालुक्यातील कोरोना नियंत्रणात येत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. याउलट चित्र कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील इतर निमशहरात आहे.

कोरोनाची दुसरी लाट आरोग्य प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर गेली आहे. पहिल्या लाटेत पुणे, मुंबईची चाकरमानी परतल्याने डोंगराळ तालुक्यात कोरोनाचे रुग्णसंख्या अधिक होती. त्यांच्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे, असाही समज निर्माण झाला होता. पण दुसऱ्या लाटेत हे चित्र उलटे झाले आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील सर्वच निमशहरात कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. याउलट ज्येष्ठ नागरिक, सहव्याधीग्रस्तांमध्ये लसीकरण जास्त झालेल्या तालुक्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याचे समोर येत आहे. यामुळे आरोग्य प्रशासनाने लसीकरणाची मोहीम गतिमान केली आहे. रुग्ण शोध मोहीम आणि तपासण्याही वाढवल्या जात आहेत. परिणामी रुग्णांची संख्या कमी होत आहे.

आतापर्यंत झालेल्या चाचण्या -८५९७६६

बाधित होण्याचे प्रमाण (टक्क्यांत) - १५.६

रुग्ण बरे होण्याचे होण्याचे प्रमाण (टक्क्यांत) - ८७.८

एकूण रुग्ण - १३४४९४

बरे झालेले रुग्ण - ११८१५९

उपचार सुरू असलेले रुग्ण - १२१३०

मृत्यू - ४२०५

तालुकानिहाय बाधित रुग्ण

आजरा : ५२१

भुदरगड : ३६१

चंदगड : २८९

गडहिंग्लज : ५६९

गगनबावडा : ७५

हातकणंगले : १५४८

कागल : ६००

करवीर : २६२५

पन्हाळा : ७६५

राधानगरी : ३८१

शाहूवाडी : ३०६

शिरोळ : ६६८

नगरपालिका कार्यक्षेत्र :७८५

महापालिका कार्यक्षेत्र : २३९३

इतर जिल्ह्यातील रुग्ण : २४४

कोट

डोंगराळ तालुक्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत. या तालुक्यात ६० वर्षांवरील लोकांच्या लसीकरणाचे प्रमाण अधिक आहे. शिवाय सामाजिक अंतरही येथे चांगले राहते. याउलट निर्बंध शिथिल केल्यानंतर कोल्हापूर शहर, हातकणंगले, करवीर आदी तालुक्यात रुग्णांची संख्या वाढली आहे. येथे सामाजिक अंतर काटेकोरपणे राखले जात नसल्याचेही निदर्शनास आले आहे.

डॉ. उषादेवी कुंभार, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी

चौकट

निर्बंध शिथिल केल्याने रुग्ण संख्या वाढली

लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर कोल्हापूर शहर, इचलकरंजी, गडहिंग्लज, हातकणंगले, करवीर तालुक्यात रुग्णांची संख्या वाढली आहे. येथे दळण वळण वाढणे आहे. अनेक ठिकाणी सामाजिक अंतरही काटेकोरपणे पाळले जात नाही. यामुळे रुग्ण संख्या वाढली आहे. कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्याही येथे अधिक आहे.