जोतिबा/कोल्हापूर : दुसऱ्या माळेला जोतिबाची तीन पाकळ्यामध्ये सालंकृत कमळ पुष्प महापूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 17:47 IST2018-10-11T11:56:06+5:302018-10-11T17:47:35+5:30

नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला जोतिबाची तीन पाकळ्यामध्ये सालंकृत कमळ पुष्प महापूजा बांधली. दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे.

In the three petitions of Jotiba, on the second floor, Salunkhar Lily Flower Mahapooja | जोतिबा/कोल्हापूर : दुसऱ्या माळेला जोतिबाची तीन पाकळ्यामध्ये सालंकृत कमळ पुष्प महापूजा

 नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला जोतिबा देवाची बांधण्यात आलेली तीन कमळ पुष्प पाकळीतील खडी सांलकृत महापूजा

ठळक मुद्देजोतिबाची तीन पाकळ्यामध्ये सालंकृत कमळ पुष्प महापूजा दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली 

जोतिबा/कोल्हापूर :  नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला जोतिबाची तीन पाकळ्यामध्ये सालंकृत कमळ पुष्प महापूजा बांधली. दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे.

श्री. जोतिबाची नवरात्रोत्सवात वैविध्यपूर्ण महापूजा बांधल्या जातात. नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेनिमित तीन पाकळ्यातील कमळ पुष्प महापूजा बांधली. या पुजेला आध्यात्मिक व शास्त्राचा आधार आहे. नवरात्रामध्ये कमळ भैरवाने काशीहून सुवर्ण कमळे आणून श्री. जोतिबाची पूजा बांधल्याची आख्यायिका सांगितली जाते. त्यांचे स्मरण म्हणून आजही रंगीबेरंगी कपडयाच्या कमळ पुष्प पाकळ्या करून ही पूजा बांधली जाते.

तीन पाकळ्या या त्रिदेवात्मक अवताराचे प्रतिक आहे. सकाळी १० वाजता यमाई मंदिराकडे वाजत गाजत धुपारती सोहळा निघाला. नवरात्रोत्सवात सलग नऊ दिवस हा धुपारती सोहळा निघतो. दुसऱ्या माळेला भाविकांनी जोतिबा दर्शनासाठी मोठी गर्दी केली. तेल अर्पण करण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांची गर्दी वाढू लागली आहे .

 

Web Title: In the three petitions of Jotiba, on the second floor, Salunkhar Lily Flower Mahapooja