शहरात डेंग्यूचे तीन रुग्ण, डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधात्मक उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 11:04 AM2020-12-08T11:04:50+5:302020-12-08T11:06:50+5:30

Dengue, Muncipal Corporation, hospital, kolhapur, Health कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य कीटकनाशक विभागामार्फत सुरू केलेल्या डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधात्मक मोहिमेत सोमवारी २८३ घरांचे डास अळी कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये तीन ठिकाणी डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळून आले आहेत. सदर ठिकाणी औषध फवारणी, धूर धुवारणी करण्यात आली तसेच दूषित आढळलेल्या १९ ठिकाणी अळीनाशक टाकण्यात आले.

Three dengue patients in the city, dengue and chikungunya preventive measures | शहरात डेंग्यूचे तीन रुग्ण, डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधात्मक उपाययोजना

शहरात डेंग्यूचे तीन रुग्ण, डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधात्मक उपाययोजना

Next
ठळक मुद्देशहरात डेंग्यूचे तीन रुग्णडेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधात्मक उपाययोजना

कोल्हापूर : महानगरपालिका आरोग्य कीटकनाशक विभागामार्फत सुरू केलेल्या डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधात्मक मोहिमेत सोमवारी २८३ घरांचे डास अळी कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये तीन ठिकाणी डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळून आले आहेत. सदर ठिकाणी औषध फवारणी, धूर धुवारणी करण्यात आली तसेच दूषित आढळलेल्या १९ ठिकाणी अळीनाशक टाकण्यात आले.

या मोहिमेवेळी चव्हाण गल्ली येथील फ्रीजमधील ट्रेमध्ये अळी आढळल्याने त्यांच्या घरामध्ये दोन डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. ही मोहीम अधिक गतिमान केली जाणार असून डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहिमेमध्ये डास अळी सर्वेक्षण औषध फवारणी व धूर फवारणी तसेच टायर जप्ती मोहीम व शौचालयाच्या व्हेंट पाईपला जाळी बांधण्याचे काम कोल्हापूर महानगरपालिकेने हाती घेतले आहे.

नागरिकांनी खबरदारी म्हणून आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळणे व टायर्स नारळाच्या करवंट्या फुटके डबे अशा वस्तूंचा नायनाट करून डेंग्यू, चिकनगुनियावर नियंत्रित ठेवण्यास मदत करावे, डेंग्यू, चिकनगुनियाची लक्षणे आढळल्यास संबंधितांनी त्वरित आरोग्य विभाग अथवा शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

Web Title: Three dengue patients in the city, dengue and chikungunya preventive measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.