शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: रात्रीत दुचाकी चोरायचे; चार-पाच हजारांत विकून मजा करायचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 18:48 IST

तिघांना अटक; १४ दुचाकी जप्त, एलसीबीची कारवाई

कोल्हापूर : रात्रीच्या अंधारात घराबाहेरील दुचाकींची चोरी करून त्याची अवघ्या चार-पाच हजारांत विक्री करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. अक्षय राजू शेलार (वय २४), विनायक बाळू गवळी (२२) आणि चंद्रदीप कुलदीप गाडेकर (२३, तिघे, रा. कागल) अशी अटकेतील दुचाकी चोरांची नावे आहेत.

पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील आठ लाखांच्या १४ दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई शनिवारी (दि. ५) दुपारी कागल डेपो येथे सापळा रचून केली. चोरलेल्या दुचाकी विकून मिळालेल्या पैशातून हे तिघे मौजमजा करीत होते.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी चोरांचा शोध घेताना अंमलदार सागर चौगले यांना कागल येथील काही संशयितांची माहिती मिळाली होती. संशयित चोरटे कागल डेपो परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच शनिवारी दुपारी सापळा रचून त्यांना अटक केली. तिघांकडील तीन दुचाकींबद्दल विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक चौकशीत त्यांच्याकडील दुचाकी चोरीतील असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यांंतून १४ दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली.चोरलेल्या दुचाकी सीमाभागात अवघ्या चार ते पाच हजारांत त्यांनी विकल्या होत्या. पुढील तपासासाठी त्यांचा ताबा शिवाजीनगर पोलिसांकडे देण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्यासह अंमलदार सागर चौगले, युवराज पाटील, राजू कांबळे, समीर कांबळे, अशोक पोवार, आदींच्या पथकाने कारवाई केली.या भागातून चोरल्या दुचाकीइचलकरंजी, कबनूर, कागल, गोकुळ शिरगाव, इस्पुर्ली, कुरुंदवाड, निपाणी आणि बसवेश्वर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या चार महिन्यांत त्यांनी चोऱ्या केल्या. चोरलेल्या दुचाकी ते चंद्रदीप गाडेकर याच्या घराजवळ असलेल्या ओढ्यात लपवत होते.घरच्यांना धक्काअटकेतील तिघेही प्रथमच पोलिसांच्या रेकॉर्डवर आले आहेत. यातील विनायक गवळी हा कोल्हापुरातील एका नामांकित नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेतो. तिघांनी १४ दुचाकींची चोरी केल्याची कबुली देताच त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस