कोल्हापूर जिल्ह्यात हजारो एकर वनजमिनींना खासगी नावे, महसूल खाते काय निर्णय घेणार याकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 17:40 IST2025-03-20T17:39:38+5:302025-03-20T17:40:14+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यातील ३१ हजार एकरांवर वनखात्याने दावा केला असताना आता महसूल खाते यावर काय कार्यवाही करणार याकडे आता ...

Thousands of acres of forest land in Kolhapur district given private names | कोल्हापूर जिल्ह्यात हजारो एकर वनजमिनींना खासगी नावे, महसूल खाते काय निर्णय घेणार याकडे लक्ष

संग्रहित छाया

कोल्हापूर : जिल्ह्यातील ३१ हजार एकरांवर वनखात्याने दावा केला असताना आता महसूल खाते यावर काय कार्यवाही करणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे. बाराही तालुक्यांत वनखात्याच्या जमिनीला हजारो जणांची वैयक्तिक, खासगी नावे लागल्याने आता याबाबत शासन नेमकी काय भूमिका घेणार हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हा मुद्दा केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरता नसून तो राज्यातील असल्याने याबाबत राज्यपातळीवरच निर्णय होण्याची गरज आहे.

कोल्हापूर येथील उपवनसंरक्षक कार्यालयाने जी टिपणी तयार केली आहे. त्यामध्ये महसूल खात्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अनधिकृतपणे वनक्षेत्र वाटप केल्याचा स्पष्टपणे उल्लेख आहे. त्यामुळे दोन शासकीय कार्यालयांमधील या विवादाबाबतच्या निर्णयाकडे अनेकांचे लक्ष लागून राहणार आहे. गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाचा जाहीर पद्धतीने हा विषय जिल्हाधिकारी कार्यालयातील सांगरूळ (ता. करवीर) येथील गायरानाच्या विषयाच्या बैठकीत समोर आला आहे.

वनखात्याचा दावा असलेली तालुकावर जमीन हेक्टरमध्ये

तालुका - जमीन

पन्हाळा - ३,४९८
शाहूवाडी - २,६९०
राधानगरी - २,५२५
करवीर - १७७४
हातकणंगले - १०६४
चंदगड - ५३३
आजरा - ४९८
भुदरगड - ३६९
कागल - २७०
गगनबावडा - ११२
गडहिंग्लज - ८१
शिरोळ - ४
एकूण - १३,४२२ हेक्टर

या गावातील वनजमिनींना खासगी नावे

  • चंदगड - कालिवडे, आसगाव, चंदगड, पाटणे, कानूर खुर्द, गवसे
  • आजरा - सुलगाव, सुळेरान, विटे, गवसे, सुळेरान, सरंबळवाडी, कानोली, मलिग्रे, चितळे, भावेवाडी
  • कागल - बोळावी, बेळिक्रे
  • हातकणंगले - आळते, मनपाडळे, नेज, टोप कासार, तासगाव, आळते येथील ५ सर्व्हे नंबरना महात्मा गांधी सह, सामुदायिक शेती संस्थेचे नाव लागले आहे.
  • पन्हाळा - बाजार भोगाव, एका सर्व्हे नंबरला छत्रपती महाराज शहाजीराजे करवीर यांचे नाव, पोर्ले तर्फ बोरगाव, बोरिवडे, मनवाड, मरळी, पोर्ले तर्फ ठाणे, उत्रे, सातार्डे, माले, पनारे, वाघुर्डे, राक्षी, कसबा ठाणे, कोतोली, निवडे, वाळोली, कोदवडे, कुशिरे, सावर्डे तर्फ आसंडोली, वेतवडे
  • राधानगरी - दुर्गमनवाड, कुडुत्री, आमजाई व्हरवडे, चंद्रे, कोदवडे, गोटेवाडी, खोपले, तेरसंबल, वाघवडे, आणाजे, शिरगावे
  • शाहूवाडी - कांटे, गजापूर, येळवण जुगाई, कडवे, माण, म्हाळसवडे, शिराळे तर्फ मलकापूर, उचत, वेलूर, साळशी, कासार्डे , पेंडखळे, परिवणे, जावळी, ओकील, येलूर, परळी, कुंभवडे, शेंबवणे, अंबार्डे, गोंडोली, कांडवण, रेठरे, पिशवी.
  • करवीर - आरळे, कांचनवाडी, केर्ले, सादळे, क. बीड, पासर्डे, मांढरे, सांगरूळ
  • गडहिंग्लज - महागाव
  • गगनबावडा - आणदूर, कोदे बु.
  • भुदरगड - पाचवडे, मानी, सोनालीपैकी शिंदेवाडी, आंबवणे, बामणे, भाटिवडे

Web Title: Thousands of acres of forest land in Kolhapur district given private names

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.