शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
5
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
6
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
7
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
8
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
9
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
10
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
11
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
12
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
13
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
14
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
15
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
16
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
17
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
18
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
19
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
20
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा

शाहू महाराजांचे विचार आजही कालसंगत : पुष्पा भावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 04:30 IST

देशात सर्वत्र अघोषित आणीबाणी असल्यासारखीच परिस्थिती आहे. त्यामुळे याविरोधात राजकीय पक्षांना जोरकसपणे काम करावे लागेल. काँग्रेसनेही केवळ तात्पुरते राजकारण करण्यापेक्षा हा सामना दीर्घकालीन असल्याचे

ठळक मुद्देदेशात अघोषित आणीबाणी! राजकीय पक्षांना दीर्घकालीन लढ्यासाठी सिद्ध व्हावे लागेल

समीर देशपांडे  कोल्हापूर : देशात सर्वत्र अघोषित आणीबाणी असल्यासारखीच परिस्थिती आहे. त्यामुळे याविरोधात राजकीय पक्षांना जोरकसपणे काम करावे लागेल. काँग्रेसनेही केवळ तात्पुरते राजकारण करण्यापेक्षा हा सामना दीर्घकालीन असल्याचे ओळखून लढाईची तयारी ठेवावी, असे स्पष्ट मत ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. पुष्पा भावे यांनी व्यक्त केले.

प्रा. भावे यांना यंदाचा कोल्हापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचा प्रतिष्ठेचा ‘राजर्षी शाहू’ पुरस्कार आज, मंगळवारी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते कोल्हापूर येथे सायंकाळी सहा वाजता प्रदान करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर त्या ‘लोकमत’शी बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, अशा परिस्थितीमध्ये निराशा दाटून येते, परंतु माणसं खाली मान घालून हे सहन करताहेत अशातला भाग नाही. जो तो ज्याला शक्य तितका विरोध करतो आहे. मात्र, राजकीय पक्ष विशिष्ट मूल्यांच्या आधारे याविरोधात ठामपणे उभे राहत नाहीत हे वास्तव आहे. असे काम करणाऱ्यांना शक्ती देण्याची भूमिका इतर पक्षांना घ्यावी लागेल.

जातीयवादाबाबत बोलताना प्रा. भावे म्हणाल्या, एका बाजूला तरुणाईचा एक गट जातिनिर्मूलनासाठी काम करतो आहे, तर दुसरीकडे असाच गट आपल्या अस्मितेचा प्रश्न म्हणून जातीला घट्ट धरून बसला आहे. हिंसाचाराचाही विषय महत्त्वाचा आहे. भाजप सत्तेत आल्यापासून अनेकजण हिंसेमध्ये लडबडलेले दिसून येतात. महाराष्ट्राबाहेर गोवंशहत्याबंदीवरून अनेकजण हिंसेवर उतरल्याची उदाहरणे आहेत.

महिलांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करून त्या म्हणाल्या, अशा घटनांमध्ये कमी वयाच्या मुलांचा असलेला सहभाग आणि वंचित वर्गातील मुलांची वाढती संख्या हे देखील चिंतेचे आणखी एक कारण आहे. कायद्याने या सर्व गोष्टी थांबतील असं मी मानत नाही. गुन्हे होतील त्याबाबत कायदा आपले काम करेल; पण मानसिकता बदलण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातूनच ठामपणे आपल्याला पुढे जावे लागेल. त्या म्हणाल्या, वर्षानुवर्षे शिक्षणापासून वंचित असलेल्या वर्गातील मुला-मुलींना डॉक्टर किंवा इंजिनिअर करताना जर कर्जे काढावी लागत असतील, तर सर्वसामान्यांसाठी हे शिक्षण आवाक्याबाहेरचेच ठरते. कितीही घोषणा होत असल्या तरी मुस्लिम आणि दलितांच्या पदरात फारसे काही पडलेले नाही हे वास्तव आहे.

शेतकऱ्याला उपाशी ठेवूनआपण काय खाणार?शेतीचा आणि शेतकºयांचा खेळखंडोबा चाललेला आपण रोज पाहत आहोत. याबाबतीत सर्वच राजकीय पक्षांनी यावर चिंतन करण्याची गरज आहे. शेतकºयाला उपाशी ठेवून आपण काय खाणार आहोत? हा साधा विचार आपल्या मनाला कसा शिवत नाही? असा सवाल यावेळी प्रा. भावे यांनी उपस्थित केला.महाराष्ट्रात समाधानकारक परिस्थिती नाहीकोणत्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची स्थिती समाधानकारक आहे असे वाटते, या प्रश्नावर सध्या तरी तसे काही दिसत नसल्याचे स्पष्ट मत प्रा. भावे यांनी व्यक्त केले. याआधीचा महाराष्ट्र काही बाबतीत तरी वेगळा वाटत होता, परंतु वाढत्या गुन्हेगारीमुळे अशी परिस्थिती आता राहिली नाही. गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करून कर्नाटक पोलीस गुन्हेगारांपर्यंत जातात, परंतु नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्यांचा असा तपास का होत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

शाहू महाराजांनी करवीर संस्थानमध्ये जे क्रांतिकारी निर्णय राबविले, ते दूरदृष्टीचे होते. दलितांपासून ते मुस्लिमांपर्यंत अनेकांची काळजी या राजाने घेतली होती. त्यांचीच धोरणे, त्यांचा विचार आता आधुनिक काळाशी सुसंगत बनवून पुढे न्यावा लागेल.- पुष्पा भावे, ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती