शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

रुद्राक्ष विक्रीसाठी आले अन् चंदन चोरले; कोल्हापूर जिल्हा न्यायालय परिसरात चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 12:04 IST

उत्तर प्रदेशच्या चोरट्यांना कर्नाटकातून अटक

कोल्हापूर : कसबा बावडा येथील जिल्हा न्यायालय परिसरातून २० हजार रुपये किमतीच्या चंदनाचे झाड लंपास करणाऱ्या उत्तर प्रदेशातील दोन चोरट्यांना पोलिसांनी कर्नाटकातील रायबाग येथून अटक केली. करण उर्फ समुसलाल सरायलाल पवार उर्फ पारधी (वय ५५) आणि रूलबाबू सरायलाल पवार उर्फ पारधी (२०, दोघे रा. हरदुवा, जि. कटणी, मध्य प्रदेश) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बुधवारी (दि. २९) ही कारवाई केली.जिल्हा न्यायसंकुल परिसरातून २० ते २१ जानेवारीदरम्यान एका चंदनाच्या झाडाची चोरी झाली होती. याबाबत न्यायालयातील शिपाई चेतन तानाजी जाधव यांनी फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील अंमलदार अमित सर्जे आणि महेश खोत यांना संशयितांची माहिती मिळाली. रुद्राक्ष विक्रीसाठी न्यायालय परिसरात आलेल्या दोघांनी चंदनाच्या झाडाची चोरी केल्याचे समजताच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यात दोन्ही चोरटे स्पष्ट दिसत होते.फुटेजवरून शोध घेतला असता दोघे कर्नाटकातील रायबाग येथे असल्याची माहिती मिळाली. रायबागला जाऊन पथकाने दोघांना अटक केली. अधिक तपासात त्यांनी चंदनाच्या झाडाची चोरी केल्याची कबुली दिली. पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास केला.रेकी करून चोरीरुद्राक्ष विक्रीच्या निमित्ताने फिरणारे चोरटे चंदनाच्या झाडांची पाहणी करतात. त्यानंतर रात्रीच्या वेळी झाड तोडून ते लंपास करतात. अटकेतील संशयितानी चोरलेल्या लाकडाची विक्री केली असून, खरेदीदाराचे नाव पोलिसांना मिळाले आहे. लवकरच त्यालाही ताब्यात घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.बंदोबस्तावरील तीन पोलिसांचे निलंबनजिल्हा न्याय संकुल परिसरात बंदोबस्तासाठी तैनात केलेल्या तीन पोलिसांनी कामात हलगर्जीपणा केल्याने पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. सहायक फौजदार जकरिया नूरमहंमद इनामदार, पोलिस नाईक संतोष हरी पाटील आणि पोलिस शिपाई विजयकुमार मारुती जाधव, अशी निलंबित पोलिसांची नावे आहेत. त्यांची नियुक्ती पोलिस मुख्यालयात होती. न्याय संकुल परिसरात कर्तव्यावर असताना त्यांनी कामचुकारपणा केल्याचे निदर्शनास आल्याने बुधवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय