रविकिरणच्या त्या बारा कामगारांनी कामावर रुजू व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 17:22 IST2020-12-14T17:18:37+5:302020-12-14T17:22:42+5:30
Labour, Gadhinglaj, PaperMill, Kolhapurnews हलकर्णी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू असलेल्या रवीकिरण पेपर्स मिल्स प्रा. लिमिटेड या कंपनीमधील आंदोलनात सहभागी झालेल्या बारा कामगारांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहन कंपनी व्यवस्थापनाने केले आहे.

रविकिरणच्या त्या बारा कामगारांनी कामावर रुजू व्हावे
चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू असलेल्या रवीकिरण पेपर्स मिल्स प्रा. लिमिटेड या कंपनीमधील आंदोलनात सहभागी झालेल्या बारा कामगारांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहन कंपनी व्यवस्थापनाने केले आहे.
कंपनीने नेमलेल्या सर्व कायम कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार, प्रॉव्हीडंड फंड, कामगार आरोग्य विमा योजना याचे लाभ दिले जात आहेत. कंपनीकडील ठेकेदार यांच्याकडूनही कामगारांना सर्व कायदेशीर लाभ दिले जात होते.
कंपनीतील १८ कामगारांनी दिनांक ८ सप्टेंबर २०२० पासून युनिनच्या सल्याने कंपनीमध्ये बेकायदेशीरपणे संपास सुरुवात केली आहे. कंपनीतील या कामगारांनी याकरिता मागणीही केवळ कायद्याप्रमाणे जाहीर होणारे महागाई भत्ता फरकाची मागणी केलेली आहे.
याबाबत कंपनीतर्फे पहिल्यापासून त्यांना कंपनीमार्फत सर्व कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार पगार देत असल्याचे सांगण्यात आले आहे.
कामगारांचा महागाई भत्ता फरक त्यातच समाविष्ट असल्याने पुन्हा नव्याने देणे कायदेशीररित्या बंधनकारक नाही, असे कळविले आहे. ह्ययुनियनह्णच्यावतीने कायदेशीर बाब न समजावून घेतली नाही.
कंपनीतर्फे देण्यात येणाऱ्या भत्त्यात कायदेशीर मतभेद असल्यास न्यायालयात दाद मागावी. न्यायालयाने जर कामगारांच्या मागणीनुसार सर्व लाभ द्यावे असे सुचविलेस कंपनी देण्यात तयार आहे.
कामगारांवर जर कंपनीने अन्याय केल्यास दाद मागायला कायदेशीर मार्ग उपलब्ध असताना चुकीच्या मार्गाने व आडमुठेपाणाची भूमिका घेवून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपासारखे टोकाचे हत्यार उपसून कामगारांना व कंपनीस ८ सप्टेंबर २०२० पासून वेठीस धरले आहे.
कंपनीतील संपात सध्या सहभागी असलेल्या १२ कामगारांना वारंवार आवाहन करूनही आजतागायत ते कामावर हजर झालेले नाहीत. युनियनने कायदेशीर मार्गाचा अवलंब न करता कामगारांची दिशाभूल करून जाणीवपूर्वक चुकीच्या मार्गाने आंदोलन करून कंपनीची बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही व्यवस्थापनाने सांगितले.