शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

Kolhapur crime: चोरट्यांनी कुत्र्यांना बिस्किटे खायला घातले, अन् घरफोडी करुन सहा तोळ्यांचे दागिने लंपास केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 12:28 IST

कोल्हापूर : कदमवाडी येथील विजयनगर हौसिंग सोसायटीत प्राध्यापिकेच्या बंगल्यातील कुत्र्यांना बिस्किटे खायला घालून चोरट्यांनी कुलूप तोडून बेडमधील सहा तोळ्यांचे ...

कोल्हापूर : कदमवाडी येथील विजयनगर हौसिंग सोसायटीत प्राध्यापिकेच्या बंगल्यातील कुत्र्यांना बिस्किटे खायला घालून चोरट्यांनी कुलूप तोडून बेडमधील सहा तोळ्यांचे दागिने लंपास केले. हा प्रकार शुक्रवारी (दि. २१) सकाळी नऊ ते रात्री अकराच्या दरम्यान घडला. याबाबत जानकी तानाजीराव सुर्वे (वय ४१, सध्या रा. कदमवाडी, मूळ रा. पाडळी, ता. तासगाव, जि. सांगली) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जानकी सुर्वे या कदमवाडीतील नर्सिंग कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहेत. विजयनगर हौसिंग सोसायटीत राजागंगा बंगल्यात त्या एकट्याच भाड्याने राहतात. त्यांच्याकडे दोन कुत्री आहेत. त्या नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी ९ वाजता घर बंद करून कॉलेजवर गेल्या. त्यावेळी त्यांची दोन्ही कुत्री बंगल्याच्या हॉलमध्ये होती.

रात्री अकराच्या सुमारास परत आल्यानंतर त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप काढलेले दिसले. आत जाऊन पाहिले असता कुत्र्यांसमोर काही बिस्किटे पडली होती. वरच्या मजल्यावरील बेडरूममध्ये साहित्य विस्कटले होते. बेडचे कुलूप तोडून चोरट्याने सहा तोळे दागिन्यांची चोरी केल्याचे लक्षात येताच त्यांनी शाहूपुरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. शाहूपुरी पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात यश आले नाही. चोरट्यांनी कुत्र्यांसमोर बिस्किटे टाकून त्यांना खाण्यात व्यस्त ठेवले. त्यानंतर त्यांनी दागिन्यांवर डल्ला मारला असावा, अशी माहिती फिर्यादींनी दिली.चार लाखांचा ऐवज चोरीसदोन तोळ्यांचे मंगळसूत्र, एक तोळ्याची सोनसाखळी, दोन तोळ्यांच्या दोन अंगठ्या, अर्ध्या तोळ्याची कर्णफुले आणि अर्धा तोळ्यांचे इतर दागिने असा सुमारे चार लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचा उल्लेख सुर्वे यांनी फिर्यादीत केला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस