शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: निवृत्त शिक्षिका पाहुण्यांकडे गेल्या; तीस तोळे दागिन्याला मुकल्या, १६ लाखांचा मुद्देमाल लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 12:03 IST

कदमवाडीतील साळोखे मळा येथे घरफोडी

कोल्हापूर : गडहिंग्लज येथील नातेवाइकांना भेटण्यासाठी गेलेल्या सेवानिवृत्त शिक्षिका नलिनी भिकाजीराव गायकवाड (वय ६९, रा. साळोखे मळा, कदमवाडी, कोल्हापूर) यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी ३० तोळे सोन्याचे दागिने आणि लाखाची रोकड, असा सुमारे १६ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. हा प्रकार बुधवारी (दि. २३) रात्री साडेआठ ते गुरुवारी (दि. २४) सकाळी आठच्या दरम्यान घडला. याबाबत गायकवाड यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त शिक्षिका निलिनी गायकवाड या नातेवाइकांसह कदमवाडीतील साळोखे मळा येथील घरात राहतात. गडहिंग्लज येथील नातेवाइकांकडे कौटुंबिक कार्यक्रम असल्याने घरातील सर्व जण बुधवारी रात्री गडहिंग्लजला गेले. गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास त्यांना त्यांच्याकडे स्वच्छता करणाऱ्या महिलेचा फोन आला. घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेल्या स्थितीत असून, आतील साहित्य विस्कटल्याचे दिसत आहे, असे त्यांनी सांगितले.चोरी झाल्याचा अंदाज येताच गायकवाड यांनी येऊन पाहणी केली असता चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून आतील लोखंडी कपाटातील ३० तोळे सोन्याचे दागिने आणि १ लाखाची रोकड लंपास केल्याचे लक्षात आले. गायकवाड यांनी कळवताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात यश आले नाही.

आयुष्यभराच्या कमाईवर डल्लासेवानिवृत्त शिक्षिका गायकवाड यांनी पैसे वाचवून वेळोवेळी दागिन्यांची खरेदी केली होती. ऐनवेळी गरज पडल्यास हाताशी असावेत म्हणून घरात लाखाची रोकड ठेवली होती. मात्र, चोरट्यांनी काही क्षणात आयुष्यभराच्या कमाईवर डल्ला मारला.

या दागिन्यांची चोरीपाच तोळ्यांचा राणीहार, पाच तोळ्यांच्या बिलवर बांगड्या, पाच तोळ्यांची मोहन माळ, तीन तोळ्यांच्या पाटल्या, तीन तोळ्यांची चेन, दोन तोळ्यांची सोन्याची नाणी, दीड तोळ्याच्या दोन अंगठ्या, दीड तोळ्याचे वळे, सव्वातोळ्याचा नेकलेस, एक तोळ्याच्या कानातील रिंगा, एक तोळ्याची जोंधळ मणीपोत आणि अर्धा तोळ्याचा कानातील वेल असे दागिने चोरीला गेले.

श्वान पथकाकडून माग काढण्याचा प्रयत्नपोलिसांनी श्वान पथकाकडून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीच सुगावा मिळाला नाही. घरामागे असलेल्या शेतातून चोरटे पसार झाले असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. ठसे तज्ज्ञांनी घरातील वस्तूंवरील ठसे घेतले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस