शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची सतर्कता! कोल्हापुरात ज्वेलर्समध्ये चोरी करताना चोरटे रंगेहाथ अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 15:37 IST

कोल्हापूर : आर. के. नगर चौकातील साई मंदिराच्या मागे महालक्ष्मी ज्वेलर्सचे दुकान फोडून चोरी करणाऱ्या चोरट्यांंना करवीर पोलिसांनी प्रसंगावधान ...

कोल्हापूर : आर. के. नगर चौकातील साई मंदिराच्या मागे महालक्ष्मी ज्वेलर्सचे दुकान फोडून चोरी करणाऱ्या चोरट्यांंना करवीर पोलिसांनी प्रसंगावधान राखून मंगळवारी मध्यरात्री रंगेहाथ पकडले. रविराज महेश कसबेकर (वय २७), अरुण मल्लाप्पा शिंदे (४६, दोघेही रा. टेंबलाई नाका झोपडपट्टी ) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून लोखंडी सळई, लोखंडी चिमटा जप्त केला आहे. त्यांना बुधवारी न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.या प्रकरणी सराफ व्यावसायिक महादेव शंकरराव गायकवाड (६६, रा. उभा मारुती चौक, शिवाजी पेठ, कोल्हापूर ) यांनी करवीर पोलिसांत फिर्याद दाखल केली. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी घरफोडी रोखण्यासाठी रात्रगस्त वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोधपथक गेले चार महिने रात्र गस्त सुरू आहे. मंगळवारी पहाटे आर. के. नगर चौक, साई मंदिरच्या मागे व्यापारी संकुल गाळा क्रमांक ३६ येथील महालक्ष्मी ज्वेलर्स येथे पथकाला काही संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यावेळी रविराज कसबेकर आणि अरुण शिंदे हे दोघे लोखंडी सळई आणि लोखंडी चिमट्याने दुकानाचे उत्तर आणि पूर्वेकडील शटर तोडत असल्याचे निदर्शनास आले. या चोरट्यांनी गाळ्याचे शटर उचकटून दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे काढले होते. हा प्रकार सुरू असतानाच गस्तीच्या पथकाने त्यांच्यावर तत्काळ कारवाई करून ताब्यात घेतले. कारवाईत पोलिस उपनिरीक्षक इनामदार, पोलिस हेड कॉन्स्टेबल सुभाष सरवडेकर, विजय तळसकर, सुमित्र पवार, विष्णू केंद्रे, गणपत पवार आदींनी सहभाग घेतला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस