शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांना’ चित्रपटसृष्टीचे दारिद्र्य दिसत नाही

By admin | Updated: August 31, 2015 23:38 IST

विलास रकटे यांची खंत : वृद्ध कलाकार आर्थिक सहाय कृतज्ञता समारंभ

कोल्हापूर : आता मराठी चित्रपटसृष्टीला चांगले दिवस आले असून, येथील कलावंत २५ लाखांपेक्षा जास्त मानधन घेत आहेत; परंतु त्यांना या चित्रपटसृष्टीतील दारिद्र्य दिसत नाही हे दुर्दैव आहे, अशी खंत चित्रपट अभिनेते विलास रकटे यांनी रविवारी येथे व्यक्त केली.शिवाजी पेठ, पेटाळा येथील राम गणेश गडकरी हॉल येथे कला संस्कृती परिवार (पुणे) यांच्यावतीने वृद्ध कलाकार आर्थिक सहाय कृतज्ञता समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे होते. यावेळी कला संस्कृती परिवाराचे मेघराज राजेभोसले, अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, अभिनेत्री शांता तांबे, प्रफुल्ल महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते चित्रपटसृष्टीतील वृद्ध कलाकारांना प्रत्येकी एक हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणीत झाला होता.विलास रकटे म्हणाले, आता हिंदुस्थानात चित्रपटसृष्टीने जी गती घेतली आहे त्याची सुरुवात कोल्हापुरातून झाली आहे. कोल्हापूरच्या मातीतूनच हे रोपटे फुलले आहे. पूर्वी कलावंत कलेच्या मागे होते त्यांना पैशांचा ध्यास नव्हता; परंतु आता चित्र वेगळे आहे. वृद्ध कलाकारांच्या पोटाची खळगी नुसती शब्दांच्या श्रीमंतीने भरणार नाहीत तर सरकारने त्यांना आर्थिक मदत केली पाहिजे.प्रा. नलगे म्हणाले, वृद्ध कलाकारांचे मानधन देताना सरकारकडून दुर्लक्ष होत आहे. आता सरकारने त्यांच्याकडे लक्ष देऊन दु:ख दूर केले पाहिजे तसेच समाजानेही त्यांना समजून घेत मदतीसाठी पुढे आले पाहिजे.भालचंद्र कुलकर्णी म्हणाले, वृद्ध कलाकारांनी आपण एकटे आहोत असे समजू नये. आम्ही तुमच्यासोबत असून, तुमचे आयुष्य सुखा-समाधानाने व्यतीत होईल, यादृष्टीने प्रयत्नशील राहू.यावेळी मेघराज भोसले, प्रफुल्ल महाजन, वृद्ध कलाकार राजाभाऊ जाधव यांचे चिरंजीव रणवीर जाधव यांनी चित्रपट कलाकारांच्या व्यथा आपल्या भाषणात व्यक्त केल्या. या कलाकारांचे अश्रू पुसण्यासाठी आघाडीच्या कलाकारांसह लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली.प्रा. मंजुश्री गोखले यांनी सूत्रसंचालन केले. नृत्यदिग्दर्शिका हेमसुवर्णा मिरजकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)यांना मिळाले मानधनकै. नामदेव श्रीपती राऊत (कारपेंटर) यांच्या पत्नी शांताबाई राऊतप्रभाकर कुलकर्णी (आॅफिसबॉय)जयश्री भाट-दमे (पार्श्वगायिका)विनोदवीर के. पंडित (मिमिक्री कलाकार)आप्पालाल मुल्ला (वायरमन)मंगला विधाते-साखरे (नृत्यकलाकार)श्रद्धा पवार (अभिनेत्री)कोया यमकर (कॅमेरामन)दत्ताराम तावडे (संकलन दिग्दर्शक)अशोक पाटील (प्रॉडक्शन मॅनेजर)सावित्रीबाई पाटील (केटरर्स)राजाराम जाधव (प्रॉडक्शन मॅनेजर)