शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महापालिकेसाठी २० प्रभागांत ८१ नगरसेवक होणार; प्रभागाची सीमारेषा कशा असतील...वाचा

By भीमगोंड देसाई | Updated: June 12, 2025 16:09 IST

१९ प्रभागात चार तर एका प्रभागात पाच सदस्य शक्य

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : चार सदस्यप्रभाग रचनेनुसार कोल्हापूर महापालिका निवडणूक होणार असल्याने २० प्रभाग होणार आहेत. एका प्रभागात पाच तर उर्वरित १९ प्रभागात चार सदस्य असणार आहेत. अलीकडची म्हणजे सन २०११ च्या जनगणनेतील लोकसंख्या आणि मतदार संख्येनुसार प्रभाग रचना होणार आहे. यानुसार २० प्रभागांत ८१ नगरसेवक जातील, असे महापालिका निवडणूक प्रशासनातर्फे बुधवारी सांगण्यात आले. दरम्यान, प्रभाग रचनेची प्रकिया सुरू झाली आहे. आज, गुरुवारी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यासाठी बैठक घेणार आहेत.राज्यातील ड वर्ग महापालिकेसंबंधी नगरविकास विभागाने मंगळवारी काढलेल्या आदेशानुसार महापालिकेची निवडणूक चार सदस्य प्रभाग रचनेनुसार होणार आहे. शहरात जर वीस प्रभाग झाले तर एका प्रभागात चार सदस्य वाढतील, पण एकूण नगरसेवकांची संख्या मावळत्या नगरसेवक इतकीच राहणार आहे. यावेळी एका प्रभागात सरासरी २० ते २४ हजार मतदार असतील, असे अधिकारी सांगतात. प्रत्यक्षात प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर मतदारसंख्याही स्पष्ट होणार आहे.

प्रशासक प्रसिद्ध करणार प्रभाग रचनाप्रारूप प्रभाग रचना तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे देणे, राज्य निवडणूक आयुक्तांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडून मान्यता घेणे, प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे, प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती घेणे, सुनावणीनंतर अंतिम मान्यता घेण्यात येणार आहे. अंतिम प्रभाग रचना प्रशासक प्रसिद्ध करणार आहेत.

प्रभागाची सीमारेषा अशा असतील..प्रभागाची सीमारेषा, मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते, रेल्वे रूळ याचा विचार प्रभाग रचनेत करण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत प्रभाग रचना करताना एका इमारतीचे, चाळीचे, घराचे विभाजन दोन प्रभागांत होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. प्रभागाच्या सीमेचे वर्णन करताना रस्ते, रेल्वे, नाले, नद्या, सीटी सर्व्हे असा करण्यात येणार आहे.

गुगल मॅपवरील नकाशाद्वारेगुगल मॅपवरून प्रभागाची नकाशा तयार करण्यात येणार आहे. प्रभागाचे क्षेत्र तत्काळ लक्षात येण्यासाठी प्रभागांना अनुक्रमांकासोबतच प्रभागाचे नाव देण्यासंबंधीही विचार करण्यात येणार आहे. पण प्रभागाला नाव देणे बंधनकारक केलेेले नाही. प्रशासक नावासंबंधी निर्णय घेणार आहेत.