शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘भुदरगड’च्या १५ कोटीच्या मालमत्ता विक्रीला प्रतिसादच मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 12:27 IST

‘उत्तूर’च्या मालमत्तेची केवळ विक्री : नव्याने निविदा काढावी लागणार

राजाराम लोंढेकोल्हापूर : भुदरगड नागरी सहकारी पतसंस्थेच्या मालमत्ता विक्रीसाठी काढलेल्या १५ कोटी ९७ लाख रुपयांच्या किमतीच्या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. नऊपैकी उत्तूर (ता. आजरा) येथील मालमत्तेची विक्री झाली, उर्वरित आठ मालमत्ता तशाच राहिल्या आहेत. अवसायक मंडळाला सहकार विभागाच्या मान्यतेने नव्याने विक्री प्रक्रिया राबवावी लागणार आहे. प्रतिसाद का मिळाला नाही? याची कारणे शोधून राखीव किंमत (अपसेट प्राइज) कमी करता येईल का? याचाही विचार करावा लागणार आहे.

कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेली भुदरगड पतसंस्था सध्या अवसायनात काढली असून, उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार कामकाज सुरू आहे. थकबाकीदारांची वसुली सुरू असताना ठेवीदारांना वीस हजार रुपयांपर्यंतची रक्कम परत केली जात आहे.संस्थेकडे असलेल्या मालमत्तांची विक्रीची प्रक्रिया सुरू केली आहे. विविध ठिकाणावरील नऊ मालमत्तांची विक्रीसाठी जाहीर निविदा डिसेंबर २०२४ मध्ये प्रसिद्ध केली होती. त्याला प्रतिसाद मिळाला नाही, केवळ उत्तूर येथील ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्तेची विक्री झाली. या मालमत्तेची किमान किंमत १ कोटी ५७ लाख ४७ हजार निश्चित करण्यात आली होती. मात्र, त्यापेक्षा अधिक म्हणजेच १ कोटी ९४ लाख रुपयांना विक्री करण्यात आली.

बारा संचालकांच्या मालमत्तांवर बोजापतसंस्थेच्या ४८ संचालक व अधिकाऱ्यांवर ४६ कोटींची जबाबदारी निश्चित केली आहे. त्यातील १६ कोटीसाठी १२ जणांच्या मालमत्तांवर बोजा चढवण्यात आला आहे. यामध्ये सात संचालक व पाच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

येथील मालमत्तांना मिळेना प्रतिसाद..मालमत्ता  - राखीव किंमत

  • पिंपरी चिंचवड ७५०० चौरस फूट - ५,२६,५०,०००
  • गारगोटी येथील आरसीसी इमारत - ३,३६,४०,०००
  • गारगोटी बाजारपेठ इमारत -  १,३३,९७,०००
  • गारगोटी ग्रामपंचायत हद्दीतील २४ हजार चौरस फूट २,७४,०१,०००
  • पिंपळगाव येथील आरसीसी इमारत  - २७,३५,०००
  • आजरा येथील तीन मजली इमारत - ९१,१९,०००
  • कुडाळ येथील मालमत्ता - २५,६७,०००
  • कुडाळ येथील ९०३ चौरस फूट - २५,२६,०००

भुदरगडच्या मालमत्ता विक्रीला प्रतिसाद मिळाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. पुन्हा विक्री निविदा काढणे ही प्रक्रियेचा भाग असतो, त्याप्रमाणे प्रक्रिया राबवली जाईल. - डॉ. महेश कदम (अवसायक व विभागीय सहनिबंधक, काेल्हापूर)

टॅग्स :kolhapurकोल्हापूर