corona virus- बारा तालुक्यांत एकही नवा रुग्ण नाही, कोल्हापुरात मात्र नवे दहा रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 12:18 IST2021-02-18T12:16:55+5:302021-02-18T12:18:05+5:30
corona virus kolhapur- गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील बाराही तालुक्यांत कोरोनाचा नवा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, कोल्हापूर शहरामध्ये दहा नवे रुग्ण आढळले असून, याशिवाय एक रुग्ण परराज्यातील आहे. दिवसभरात सात जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, एकाही कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला नाही, ही दिलासादायक बाब आहे.

corona virus- बारा तालुक्यांत एकही नवा रुग्ण नाही, कोल्हापुरात मात्र नवे दहा रुग्ण
कोल्हापूर : गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील बाराही तालुक्यांत कोरोनाचा नवा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, कोल्हापूर शहरामध्ये दहा नवे रुग्ण आढळले असून, याशिवाय एक रुग्ण परराज्यातील आहे. दिवसभरात सात जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, एकाही कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला नाही, ही दिलासादायक बाब आहे.
अन्य काही जिल्ह्यांत कोरोनाची रुग्णसंख्या वाढीस लागली आहे. या पार्श्वभूमीवर शासनानेही नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. अशा परिस्थितीत बाराही तालुक्यांत एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे हे जरी दिलासादायक असले तरी यापुढच्या काळात अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.
गेल्या २४ तासांत २३८ जणांची तपासणी करण्यात आली असून, ६५० जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. १३५ जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली असून, सध्या १३४ रुग्ण उपचार घेत आहेत.