शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

शाळेच्या इमारतीसाठी निधी नाही; विद्यार्थी झाडाखाली घेतायत शिक्षण; शिक्षणमंत्र्यांच्या पालकत्व असलेल्या जिल्ह्यातील दयनीय अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 14:11 IST

इमारत नसल्याने गैरसोय; मनपाचे दुर्लक्ष

कोल्हापूर : एकीकडे महापालिकेच्या शाळेत विद्यार्थीच येत नसल्याची ओरड करणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाला विद्यार्थ्यांनी फुल्ल झालेल्या फुलेवाडीतील रावबहादूर दाजिबा विचारे विद्यामंदिरला गेल्या चार वर्षांपासून इमारतीसाठी निधी देता आलेला नाही. त्यामुळे या शाळेचे विद्यार्थी सध्या झाडाखाली, एका दुकान गाळ्याच्या पत्र्याच्या शेडखाली बसून शिक्षण घेत आहेत. ऊन, वारा, पावसाचा सामना करत गेल्या चार वर्षांपासून विद्यार्थी ज्ञानार्जन करीत असूनही महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींना या विद्यार्थ्यांसाठी निवारा करावासा वाटला नाही. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या पालकत्व जिल्ह्यातच शिक्षणाबाबतची ही दयनीय अवस्था असेल तर इतरांचे काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.रंकाळा बसस्थानकाजवळ महापालिकेची बंद असलेली रावबहादूर दाजिबा विचारे विद्यालय ही शाळा २०१९ मध्ये माजी शिक्षण समिती सभापती वनिता देठे यांच्या पुढाकाराने फुलेवाडी रिंग रोड, गंगाई लॉनजवळ स्थलांतरित केली. सेमी इंग्रजी माध्यमाच्या या शाळेत सध्या पहिली ते चौथीपर्यंत तब्बल २१० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेची गुणवत्ता चांगली असल्याने प्रवेशासाठी रीघ लागली आहे.मात्र, मुलांना बसायलाच जागा नसल्याने शाळेने प्रवेश बंद केले आहेत. या परिसरात महापालिकेच्या तीन ठिकाणी जागा आहेत. शाळेच्या इमारतीसाठी निधी देण्याचा प्रस्ताव तीन वर्षांपूर्वी महापालिकेला दिला आहे. पण, त्यावर कोणतीच कार्यवाही होत नसल्याने विद्यार्थ्यांना उघड्यावर शिक्षण घेण्याची वेळ आली आहे.

शाळेची गुणवत्ता चांगली असल्याने आम्ही पाल्याला दोन वर्षांपूर्वी शाळेत प्रवेश घेतला. पण, इमारत नसल्याने विद्यार्थ्यांची कुचंबणा होत आहे. - प्रीती गव्हाणे, पालक 

महापालिकेच्या चिंतामणी हॉलमध्ये या विद्यार्थ्यांची सोय करण्यात येईल. सीएसआर फंडातून इमारत बांधून देण्याचा एक प्रस्ताव आमच्याकडे आला आहे. त्यावर निर्णय झाला नाही तर महापालिका स्तरावर लवकरच इमारतीसाठी कार्यवाही सुरू करू. - शंकर यादव, प्रशासनाधिकारी, शिक्षण विभाग, महापालिका

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSchoolशाळाDeepak Kesarkarदीपक केसरकर guardian ministerपालक मंत्री