शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पाणी येण्याची शक्यता, शिये-कसबा बावडा रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 17:41 IST

सतीश पाटील कोल्हा पूर : शिरोली येथे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सेवा मार्गावर आणि शिये-कसबा बावडा रस्त्यावर तब्बल पाच ...

सतीश पाटीलकोल्हापूर : शिरोली येथे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सेवा मार्गावर आणि शिये-कसबा बावडा रस्त्यावर तब्बल पाच फूट पाणी यावर्षी लवकर आले आहे. ४६, किंवा ४७ फुटांवर पंचगंगेची पातळी गेली तर महामार्गावर पाणी येण्याची शक्यता आहे.राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पाणी पातळी ४५ फुटांवर पोहाेचल्यावर शिये-कसबा बावडा रस्त्यावर पाणी यायला सुरुवात होते. शिरोली येथे पुणे-बंगळुरू महामार्गालगत असलेल्या सेवा मार्गावर ४६, ४७ फुटांवर पाणी पातळी गाठली की पाणी येते. सन २०१९, २०२१ साली महापूर आला तेव्हाची ही परिस्थिती होती. मात्र, सध्या पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावर ४१ फूट पाणी पातळी गाठल्यावर शिये-कसबा बावडा रस्त्यावर पाणी आले आहे.मंगळवारी रात्री या रस्त्यावर तीन फूट पाणी पातळी झाली. यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. तर शिरोली येथील पुणे-बंगळुरू महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या सेवा मार्गावरही ४१.५ फुटांवर पाणी आले आहे. याठिकाणी पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावर ४६ फूट पाणी पातळी गाठल्यावर पाणी येत होते. पण यंदा तब्बल पाच फूट पाणी पातळी कमी असतानाही पाणी आल्याने शिरोली येथील सेवा मार्ग बंद झाले आहेत.शिये-बावडा रस्त्यावर नदीपात्रात भराव टाकून आणि नदीकिनारी झालेली बांधकामे, कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीतील बांधकामे, शिरोली महामार्गालगत मोठेमोठे भराव टाकून उभारलेली शोरूम पंचगंगा नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण करत आहेत. त्यामुळे पंचगंगा नदी ही सन २०१९, आणि २०२१ च्या तुलनेत पाच फूट लवकर विस्तारली आहे. सन २०१९, व २०२१ ला कृष्णा, कोयना, वारणा नद्यांना पूर आला असताना तसेच कोयना, वारणा राधानगरी धरणाचे दरवाजे साेडले असतानाही त्यावेळी ४५ फुटांवर पाणी आले होते.पण यंदा तशी कोणतीही परिस्थिती नसताना आणि पंचगंगा नदीने अद्याप धोका पातळीही गाठली नसताना शिये-बावडा रस्ता बंद होतो, सेवा मार्गावर पाणी येत याला मानव निर्मित बांधकामच कारणीभूत आहेत.असाच पाऊस राहिला आणि पाणी पातळी ४६, ४७ फुटांवर गेली तर महामार्गावर पाणी येण्याची दाट शक्यता आहे. २०१९ आणि २०२१ ला ५०, ५१ फुटांवर पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्यावर महामार्गावर पाणी आले होते. पण यंदा मात्र पाणी लवकरच येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसfloodपूरhighwayमहामार्ग