शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

शिवाजी पार्कमधील १६ रस्त्यांची लागली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 2:06 PM

Road Kolhapur : कोल्हापूर येथील शिवाजी पार्कमधील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी सर्वच रस्ते उकरल्याने रहिवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. सद्या पार्कमधील १६ रस्त्यांची वाईट अवस्था झाली आहे. तेथील रस्त्यांची वाट लागल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. यातून तीन महिन्यांपूर्वी प्रमुख रहिवाशांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांचे लक्ष वेधले आहे; पण रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे.

ठळक मुद्देशिवाजी पार्कमधील १६ रस्त्यांची लागली वाट महापालिकेचे दुर्लक्ष, रहिवाशांची गैरसोय

कोल्हापूर : येथील शिवाजी पार्कमधील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी सर्वच रस्ते उकरल्याने रहिवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. सद्या पार्कमधील १६ रस्त्यांची वाईट अवस्था झाली आहे. तेथील रस्त्यांची वाट लागल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. यातून तीन महिन्यांपूर्वी प्रमुख रहिवाशांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांचे लक्ष वेधले आहे; पण रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे.विक्रम हायस्कूलपासून शिवाजी पार्कचा रहिवासी परिसर सुरू होतो. तेथे उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय कुटुंबे राहतात; पण या परिसरातील रस्ते दुरुस्तीकडे महापालिका प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष झाल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. महिन्यापूर्वी पार्कमधील प्रमुख रस्ते गॅस आणि पिण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी उकरण्यात आले. त्यानंतर रस्ते पूर्ववत करण्याकडे लक्ष दिले नाही. अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. मातीचे ढिगारे आहेत. पावसाचे पाणी रस्त्यातच तुंबते. हलक्या पावसातही चिखल होतो. या रस्त्यावरून जाताना पादचाऱ्यांसह वाहनधारकांनाही तारेवरची कसरत करावी लागते. यातून अपघाताच्या घटनाही घडत आहेत.विक्रम हायस्कूल चौक ते नानासाहेब गद्रे बालोद्यानजवळून जाणारा ॲपेक्स नर्सिंग होमसमोरील रस्ता खेड्यांपेक्षा वाईट झाला आहे. कापसे बंगला ते भुर्के बंगलापर्यंतच्या रस्त्यावरून चालतही जाता येत नाही, अशी अवस्था त्याची झाली आहे. पार्कमधील सर्वच रस्ते खड्डेमय आहेत. पाऊस पडल्यानंतर दलदल आणि ऊन पडल्यानंतर धूळ असे चित्र तिथे असते.आमदारांची भेटशिवाजी पार्कमधील रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाल्याच्या तक्रारी वाढल्याने आमदार चंद्रकांत जाधव यांनी मंगळवारी विविध रस्त्यांची पाहणी केली. त्यांनी खराब रस्ताप्रश्नी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पावसाळा होईपर्यंत किमान रस्त्यावरचे खड्डे तरी भरावे, अशा त्यांनी सूचना दिल्या.

शिवाजी पार्कमधील तब्बल १६ रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यांवरून चालतानाही अनेक अडथळ्यांशी सामना करावा लागतो. रस्ते दुरुस्त करण्याच्या मागणीचे निवेदन मार्च महिन्यात आयुक्तांकडे दिले होते. अजून काहीही कार्यवाही झालेली नाही.ॲड. अभिजित कापसे, रहिवासी

शिवाजी पार्कमधील अनेक रस्त्यांवरून चालतही जाता येत नाही. पाऊस सुरू झाल्यानंतर चिखलाचे साम्राज्य असते. रोज किरकोळ अपघात होत आहेत. यामुळे वाहनधारक आणि रहिवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे.ॲड. कल्याणी माणगावे,सामाजिक कार्यकर्त्या

गॅस आणि पिण्याच्या पाईपलाईनसाठी शिवाजी पार्कमधील रस्ते उकरले आहेत. ते नव्याने करण्यासाठी सव्वा कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. निविदा प्रसिद्ध केली आहे. ठेकेदार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे; पण पावसाळ्यानंतरच नवीन रस्त्याचे काम सुरू होईल. तोपर्यंत मुरूम टाकून खराब रस्ते दुरुस्त केले जातील.-हर्षजित घाटगे,उपशहर अभियंता, महापालिका

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाkolhapurकोल्हापूर