...तर परीक्षा केंद्रे उधळून लावू : मराठा समाज संघटनांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 20:39 IST2020-10-01T20:37:05+5:302020-10-01T20:39:53+5:30
mpsc examination centers, warning, Maratha community organizations, kolhapur मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत एमपीएससी तसेच अन्य शासकीय परीक्षा रद्द कराव्यात अन्यथा हिंसक आंदोलनाला सामोरे जावे लागेल; परीक्षा केंद्रे उधळून लावली जातील, असा इशारा गुरुवारी कोल्हापुरात मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा, मराठा विद्यार्थी परिषद या संघटनांनी दिला.

...तर परीक्षा केंद्रे उधळून लावू : मराठा समाज संघटनांचा इशारा
कोल्हापूर : मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत एमपीएससी तसेच अन्य शासकीय परीक्षा रद्द कराव्यात अन्यथा हिंसक आंदोलनाला सामोरे जावे लागेल; परीक्षा केंद्रे उधळून लावली जातील, असा इशारा गुरुवारी कोल्हापुरात मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा, मराठा विद्यार्थी परिषद या संघटनांनी दिला.
येत्या सोमवार (दि. ५)पर्यंत याबाबत निर्णय घेतला नाही तर मुंबईतील मातोश्रीसमोर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
आरक्षणाचा निर्णय घेण्यापूर्वीच जर एमपीएससी तसेच राज्य सेवा परीक्षा घेतल्या तर मराठा समाजातील लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर या तिन्ही संघटनांच्या वतीने आबासाहेब पाटील, विशाल पाटील, दिलीप पाटील, सचिन तोडकर, स्वप्निल पार्टे यांनी आपली भूमिका मांडली.