वडगावातील यादव काॅलनीत चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:41 IST2020-12-15T04:41:47+5:302020-12-15T04:41:47+5:30
त्यानंतर चोरट्यांनी जवळच असलेले सेवानिवृत्त शिक्षक सर्जेराव मोरे व त्यांचा मुलगा पोलीस उपनिरीक्षक धनंजय मोरे यांच्या घराकडे मोर्चा वळविला. ...

वडगावातील यादव काॅलनीत चोरी
त्यानंतर चोरट्यांनी जवळच असलेले सेवानिवृत्त शिक्षक सर्जेराव मोरे व त्यांचा मुलगा पोलीस उपनिरीक्षक धनंजय मोरे यांच्या घराकडे मोर्चा वळविला. यामध्ये वरच्या बाजूला मोरे, तर खाली सेवानिवृत्त पोलीस अधिकारी वसंतराव बागल हे भाड्याने राहतात. मोरे यांच्या घरातील कोल्हापूर, तर बागल हे मूळ गावी चिकुर्डे येथे गेले होते. या दोन्ही घरात कोणी नसल्याची संधी चोरट्यांनी साधली. त्यांनी कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. येथे चोरट्यांनी बागल यांच्या घरातील रोख ६३ हजार रुपये, तर १३ हजार चांदीचे दागिने असा मुद्देमाल चोरून नेला. मात्र, एकाच दिवशी तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला. रात्री उशिरा या चोरीची नोंद वडगाव पोलिसांत झाली. याबाबत फिर्याद वसंतराव बागल यांनी दिली.