आमदार जाधव यांच्या आईकडील दागिन्यांच्या पर्सची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 12:59 IST2021-04-13T04:24:29+5:302021-04-13T12:59:56+5:30
Crimenews Kolhapur : आमदार चंद्रकांत जाधव यांच्या आई प्रभावती रमेश जाधव (वय ७५, रा. मंगळवार पेठ) या सोमवारी सकाळी मंगळवार पेठेतील शिंगोशी मार्केट येथे भाजी खरेदीसाठी गेल्या होत्या. तेथे अज्ञात चोरट्याने त्यांची आठ तोळे सोन्याचे दागिने असलेली पर्स हाताेहात लंपास केली. याबाबत त्यांनी सोमवारी रात्री जुना राजवाडा पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली.

आमदार जाधव यांच्या आईकडील दागिन्यांच्या पर्सची चोरी
कोल्हापूर : आमदार चंद्रकांत जाधव यांच्या आई प्रभावती रमेश जाधव (वय ७५, रा. मंगळवार पेठ) या सोमवारी सकाळी मंगळवार पेठेतील शिंगोशी मार्केट येथे भाजी खरेदीसाठी गेल्या होत्या. तेथे अज्ञात चोरट्याने त्यांची आठ तोळे सोन्याचे दागिने असलेली पर्स हाताेहात लंपास केली. याबाबत त्यांनी सोमवारी रात्री जुना राजवाडा पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रभावती जाधव या शिंगोशी मार्केटमध्ये सकाळी भाजी खरेदीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी त्यांचे पाच तोळे सोन्याचा हार व तीन तोळे वजनाचा लक्ष्मीहार असे सुमारे आठ तोळे सोन्याचे दागिने आपल्या छोट्या पर्समध्ये ठेवले होते.
भाजी खरेदी करून त्या घरी गेल्या, त्यावेळी त्यांना आपली पर्स नसल्याचे लक्षात आले. त्यांनी त्याबाबतची माहिती घरच्यांना सांगितली. त्यानंतर प्रभावती जाधव व त्याच्या नातेवाइकांनी शिंगोशी मार्केट परिसरात येऊन पुन्हा पर्सची शोधाशोध केली; पण ती मिळाली नाही. अखेर त्यांनी सोन्याचे दागिने असणारी पर्स अज्ञाताने चोरल्याची फिर्याद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली.