कोरोना रुग्णाच्या घरात चोरी, बापूराम नगरातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 11:30 AM2021-05-13T11:30:22+5:302021-05-13T11:32:58+5:30

CoronaVirus Crimenews Kolhapur : कोरोनाचे उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाच्या बंद घरी अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे ४० हजारांचे दागिने लंपास केले. ही घटना कळंबा येथील बापूराम नगरात घडली. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद झाला आहे.

Theft in Corona patient's house, type in Bapuram town | कोरोना रुग्णाच्या घरात चोरी, बापूराम नगरातील प्रकार

कोरोना रुग्णाच्या घरात चोरी, बापूराम नगरातील प्रकार

Next
ठळक मुद्देकोरोना रुग्णाच्या घरात चोरी, बापूराम नगरातील प्रकार ४० हजारांचे दागिने लंपास

कोल्हापूर : कोरोनाचे उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाच्या बंद घरी अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे ४० हजारांचे दागिने लंपास केले. ही घटना कळंबा येथील बापूराम नगरात घडली. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बापूराम नगरात राहणारे एक खासगी नोकरदार हे कुटुंबांसह भुदरगड तालुक्यातील सासुरवाडीत गेले होते. तेथे त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांची कोरोना चाचणी घेतली. त्यांना कोरोना लागण झाल्याचा अहवाल आला. त्यामुळे त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, त्यांची पत्नी दोन मुलांसह गावीच राहिले. बापूराम नगरातील त्यांचे बंद घर पाहून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला, तसेच आतील पाण्याचे मीटर व तिजोरीतील एक तोळे वजनाचा सोन्याचा नेकलेस चोरून नेला.

दरम्यान, बुधवारी सकाळी त्यांच्या घरातून पाणी वाहत असल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी शेजाऱ्यांनी पहाणी केली असता, चोरीचा प्रकार उघडकीस आला. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Web Title: Theft in Corona patient's house, type in Bapuram town

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.