शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या नांगनूर शाखेत चोरी; १६ लाखांचा ऐवज लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 12:06 IST

५.८६ रोकडसह १८ तोळ्यांचे दागिने गायब

हलकर्णी (जि. कोल्हापूर) : नांगनूर (ता. चंदगड) येथील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेसह पोस्ट ऑफिसमध्ये चोरी झाली आहे. बँकेतील पाच लाख ८६ हजार रोकडसह १८ तोळ्यांचे सोन्याचे दागिने, तर पोस्ट ऑफिसमधील ६,३०० रुपयांची रोकड मिळून १६ लाखांचा ऐवज लांबविला. रविवारी सकाळी साडेअकरा वाजता ही घटना उघडकीस आली.नांगनूर येथे तानाजीराव मोकाशी सहकारी दूध संस्थेच्या मालकीच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जिल्हा बँकेची शाखा, पोस्ट कार्यालय व महावितरण कंपनीचे कार्यालय एकमेकांना लागून आहेत. शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी इमारतीच्या तळमजल्यावरील लोखंडी मुख्य दरवाजाचे कुलूप आणि बँकेच्या व पोस्ट कार्यालयाच्या दरवाजांची कुलपे कटरने कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला.बँकेच्या स्ट्राँग रूमच्या दरवाजाचे कुलूप कटरने तोडले आणि लोखंडी तिजोरीचे कुलूप डुप्लिकेट चावीच्या साहाय्याने उघडून, त्यातील रोख ५ लाख ८६ हजारांसह ग्राहकांनी तारण ठेवलेले १८ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लांबविले. त्यानंतर, पोस्टाची तिजोरी हातोडीने फोडून त्यातील ६,३०० रुपये लांबविले. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास वीज वितरणचे कर्मचारी ऑफिसकडे गेले असता, हा प्रकार उघडकीस आला. त्याने बँकेच्या व पोस्टाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकारी व पोलिसांना माहिती दिली.

कॅमेरे फिरविले, ‘डीव्हीआर’ फोडला!नांगनूर ग्रामपंचायतीने दूध संस्थेच्या इमारतीच्या बँकेकडे जाणाऱ्या जिन्यावर बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दिशा बदलून चोरट्यांनी पहिल्या मजल्यावर प्रवेश केला. चोरी करून परतताना ‘सीसीटीव्ही’तील माहिती संकलित करणारे ‘डीव्हीआर’ मशीनही स्ट्राँग रूमच्या खोलीत नेऊन फोडून टाकल्याचे पंचनाम्यात निदर्शनास आले. पोलिसांनी तो ‘डीव्हीआर’ ताब्यात घेतला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीbankबँकtheftचोरी