शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Crime News kolhapur: प्रियकरासोबत पळून जाऊन पत्नीने केलं दुसरं लग्न; व्यथित पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 11:22 IST

संसार व्यवस्थित असताना पाच महिन्यांपूर्वी अचानक पत्नीने मुलांना वाऱ्यावर सोडून, प्रियकराचा हात पकडून पलायन केले.

कोल्हापूर : तीन गोंडस मुलांना व पतीला सोडून प्रियकराचा हात धरून पत्नीने पलायन केले, तसेच तिने प्रियकराशी लग्न केल्याचे फोटोही दोन दिवसापूर्वी पतीच्या मोबाईलवर पाठविले. हे फोटो पाहून व्यथित झालेल्या पतीने सोमवारी दुपारी स्वत:च्या हातावर ब्लेडने वार करून घेतले, तसेच सायंकाळी व मंगळवारी सकाळी दोनवेळा झोपेच्या गोळ्या खाऊन जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला.भांबावलेल्या त्याच्या तीन लहान मुलांनी त्याला सरकारी रुग्णालयात आणले. ही घटना कोल्हापूर शहरानजीकच्या एका गावात घडली. अवघ्या ३२ वर्षांच्या मोलमजुरी करून घर चालविणाऱ्या या तरुणास तीन गोंडस मुले आहेत. संसार व्यवस्थित असताना पाच महिन्यांपूर्वी अचानक पत्नीने मुलांना वाऱ्यावर सोडून, प्रियकराचा हात पकडून पलायन केले.

७, १० अन् १३ वर्षे वयाच्या पोटच्या मुलांना सोडून पत्नी गेल्यामुळे पती व्यथित झाला. त्याने तिला वारंवार फोन करून घरी येण्याची विनंती केली. पण तिने नकार दिला. पत्नी बेपत्ताची तक्रारही पोलीस ठाण्यात दिली, पण पोलिसांनी शोधकार्यच राबविले नसल्याचे पतीने सांगितले.

पत्नीनेच पाठविले विवाहाचे फोटो

  • पळून गेलेल्या पत्नीने प्रियकराशी विवाह केल्याचे फोटो सोमवारी सकाळी त्याच्या मोबाईलवर पाठवले.
  • फोटो पाहून व्यथित झालेल्या पतीने पोटच्या लहान मुलांची काळजी न करताच स्वत:च्या हातावर ब्लेडने वार करून रक्तबंबाळ करून घेतले.
  • अखेर त्याच्या तीन लहान मुलांनी आजीच्या मदतीने त्याला सीपीआर रुग्णालयात उपचारास आणले व उपचार करवून घरी नेले.
  • पण पुन्हा सायंकाळी व मंगळवारी सकाळी त्याने झोपेच्या गोळ्या खाऊन जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिन्हीही मुले ‘सीपीआर’मध्ये कावरी-बावरी होऊन फिरत होती.
  • अखेर दुपारी त्याच्या बहिणीने रुग्णालयात येऊन त्या आपल्या तीन भाच्यांना मायेचा आधार दिला.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्न