शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गौरीच्या मुखवट्यावरील ७ तोळे दागिन्यांवर डल्ला, अंधाराचा फायदा घेत चोरटे झाले पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 13:08 IST

चोरट्यांचा पाठलाग करण्यात आला, पण ते पळून जाण्यात यशस्वी झाले

देवाळे : माले (ता. पन्हाळा) येथील अरुण आनंदा चौगुले यांच्या घरी गौरीच्या मुखवट्यावर घातलेले सात तोळे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार शनिवारी मध्यरात्री घडला. चोरट्यांचा पाठलाग करण्यात आला, पण ते पळून जाण्यात यशस्वी झाले. याप्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.याबाबत पोलिसांकडून आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, अरुण चौगुले यांचे घर जिल्हा परिषद मराठी शाळा कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आहे. गौरी-गणपतीचा सण असल्याने चौगुले यांनी परंपरेप्रमाणे आपल्या घरातील सोन्याचे दागिने गौरीच्या मुखवट्यावर घातले होते. मात्र, चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास घराचा पाठीमागचा दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून दरवजा उघडून घरात प्रवेश केला आणि गौरीच्या मुखवट्यावरील अंदाजे सात तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. दोन तिजोरीतील अन्य वस्तू मिळतील या हेतूने चोरट्यांनी तिजोरीकडे मोर्चा वळवला परंतु  त्यांच्या हाती काही लागले नाही.दरम्यान अरुण चौगुले कामावरून परत आला असता घराचे दार उघडण्यासाठी घरातील लोकांना फोन केला. फोनचा आवाज ऐकून अज्ञात दोन चोरट्यानी धूम ठोकत असताना  अरुण व त्याच्या आईने आरडाओरडा केला. अरुणने चोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले.चोरीचा तपास करण्यासाठी घटनास्थळी ठसे तज्ञ व स्टेला नावाच्या श्वानासह पथकाला पाचारण करण्यात आले होते. यावेळी श्वान घरा सभोवती घुटमळत राहिले. या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर पवार करत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस