शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकारणातून निवृत्तीच्या चर्चांवर खुद्द नारायण राणेंचे उत्तर, म्हणाले- "जर माझ्या पदाचा..."
2
"युतीसाठी मी ५० मिनिटे भाजपा कार्यालयात ताटकळत बसलो, पण शेवटी..."; प्रताप सरनाईकांचा आरोप
3
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या घरावर हल्ला, खिडक्यांची तोडफोड, एकाला अटक!
4
आमदारांनी लावली कुटुंबातील सदस्यांची बिनविरोध वर्णी?; 'सेटलमेंट-अ‍ॅडजस्टमेंट'चे राजकारण
5
आंध्र प्रदेशात ONGC पाइपलाइनमधून गॅसगळतीनंतर भीषण आग; परिसरात भीतीचे वातावरण
6
मीरा भाईंदरमध्ये आठवडा होत आला तरीही उमेदवारांची शपथपत्रेच 'अपलोड' केलेली नाहीत
7
भाजप निवडणूक आयोगाला खिशात घेऊन फिरतंय का? बिनविरोध निवडीवरून नाना पटोलेंचा घणाघात!
8
‘५ लाख द्या, नाहीतर अश्लील व्हिडीओ व्हायरल करेन’, ड्रायव्हरची मालकिणीला धमकी, त्यानंतर...  
9
नवनीत राणांनी अजित पवारांना दिलेल्या 'त्या' सल्ल्यावर खोडके बरसले; म्हणाले 'औकातीत राहून बोलायला शिका'
10
व्हेनेझुएलावर अचानक हल्ला करून अमेरिकेचा चीन-रशियाला मोठा इशारा; भारतावर काय होणार परिणाम?
11
छाप्यानंतर सुरू व्हायचा 'खेळ', CGST डेप्युटी कमिशनर प्रभा भंडारीच्या घरीच व्हायची 'ती' डील
12
'जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत लाडक्या बहिणींचा निधी बंद होणार नाही'- देवेंद्र फडणवीस
13
मणिपूर हादरले! पहाटेच्या वेळी तीन शक्तिशाली IED स्फोट, सुरक्षा यंत्रणांनाही धक्का, दोन जखमी
14
"फटाके फोडणारे देशद्रोही आहेत, भारतात फटाक्यांवर बंदी घाला"; भाजपा नेत्या मनेका गांधी भडकल्या
15
व्हेनेझुएलावर झालेल्या हल्ल्यादरम्यान आमचे ३२ नागरिक मारले गेले, या देशाचा अमेरिकेवर आरोप
16
सावधान! तोतया पोलीस अधिकारी आणि कुरिअरचा सापळा; ८१ वर्षीय व्यावसायिकाला ७ कोटींचा चुना
17
"जे झालं ते चुकीचं! बांगलादेश संघाने भारतात यायचं की नाही ते..." हरभजन सिंग नेमकं काय म्हणाला?
18
निकोलस मादुरो या भारतीय बाबाचे आहेत भक्त; त्यांच्या कार्यालयातील भींतीवरही भला मोठा फोटो
19
"सर लवकर या, माझ्या वडिलांना हे मारून टाकतील"; बाप-लेकाला भररस्त्यात अमानुष मारहाण
20
"इतिहास सांगेल गद्दार कोण!" निकोलस मादुरो यांचा मुलगा संतापला, अमेरिकेला दिलं चॅलेंज!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election 2026: भाजप, शिंदेसेनेचे तीन प्रभागांतून चिन्ह गायब; काँग्रेस १५ प्रभागांत एकहाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 19:05 IST

एकच चिन्ह देण्यासाठी तडजोड

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रत्येक प्रभागात आपला उमेदवार असावा यासाठी महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये बरीच ताणाताणी झाली. मात्र, त्यानंतरही भाजप आणि शिंदेसेनेचे प्रत्येकी तीन प्रभागांतून चिन्ह गायब झाले आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक ७४ जागा लढविणाऱ्या काँग्रेसचे १५ प्रभागांमध्ये चारही जागांवर हाताच्या चिन्हावर उमेदवार आहेत. भाजपला प्रभाग क्रमांक १, २ व १७ या प्रभागांमध्ये एकही उमेदवार देता आला नाही. प्रभाग १ व २ मध्ये चारही उमेदवार शिंदेसेनेचे आहेत, तर प्रभाग क्रमांक १७ मध्ये चारही उमेदवार राष्ट्रवादीचे आहेत. प्रभाग क्रमांक ३ व १६ मध्ये सगळेच उमेदवार कमळाच्या चिन्हावर लढत असल्याने येथे शिंदेसेना व राष्ट्रवादीचा एकही उमेदवार रिंगणात नाही, तर प्रभाग १७ मधील चारही उमेदवारांकडे घड्याळ असल्याने येथे ना कमळ फुलणार आहे ना धनुष्यबाण ताणले जाणार आहे.

वाचा : लोकांनी यांचे ऐकलं असते तर पावणेतीन लाखांनी कार्यक्रम झाला नसता, सतेज पाटील यांचा धनंजय महाडिकांना टोलामहानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रत्येक प्रभागात आपले चिन्ह पोहोचावे यासाठी सारेच पक्ष धडपडत असतात. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत ८१ जागांसाठी २० प्रभागांमध्ये धुरळा उडाला असला तरी भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी या महायुतीमधील पक्षांना सर्वच प्रभागांत आपले उमेदवार देता आलेले नाहीत. युतीच्या जागावाटपात काही प्रभागांतील सर्वच जागा मित्र पक्षांना द्याव्या लागल्याने ही अडचण निर्माण झाली आहे.

कोणत्या प्रभागांमध्ये काँग्रेसचे चारही उमेदवारमहापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढताना काँग्रेस ७४ जागांवर लढत आहे. एक उमेदवार काँग्रेसने पुरस्कृत केला आहे, तर उद्धवसेनेला सहा जागा दिल्या आहेत. प्रभाग क्रमांक १, ५, ९, २, ३, ४, ६, ८, १२, १३, १६, १७, १८, १९ व २० अशा १५ प्रभागांमधील चारही जागांवर काँग्रेसचे उमेदवार आहेत, तर प्रभाग क्रमांक ७, १०, ११, १४ व १५ येथील काही जागांवर उद्धवसेना व काही जागांवर काँग्रेस लढत आहे.

वाचा : अर्ज माघारीत घोळ झाला, कोल्हापुरात 'या' प्रभागात महायुतीचा अधिकृत उमेदवारच नाही राहिला८ प्रभागांत एकहातीआठ प्रभागांमध्ये महायुतीचे एकत्रित उमेदवार प्रभाग क्रमांक २० मध्ये भाजप तीन जागांवर तर शिंदेसेना एका जागेवर लढत आहे. तर प्रभाग क्रमांक ४, ५, ७, ९ मध्ये भाजप व शिंदेसेना प्रत्येकी दोन जागा लढवत आहे. प्रभाग क्रमांक ६, ८, १०, ११, १३, १४, १५, १८ या आठ प्रभागांमध्ये भाजप, शिंदेसेना व राष्ट्रवादीला आपला एक तरी उमेदवार उभे करण्याची संधी मिळाली आहे.

एकच चिन्ह देण्यासाठी तडजोडकाही प्रभागांमध्ये एकच चिन्ह असावे हा दृष्टिकोन ठेवून भाजप-शिंदेसेनेने त्यांचे उमेदवार एकमेकांच्या चिन्हावर उभे केले आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक १ मध्ये अमर साठे हे भाजपचे पदाधिकारी आहेत. मात्र, त्यांना शिंदेसेनेच्या धनुष्यबाणावर उभे केले आहे. असेच प्रकार काही प्रभागांमध्येही केल्याने भाजप, शिंदेसेनेला सर्व प्रभागांमध्ये कमळ व धनुष्यबाण देता आलेले नाही.

फटका कधी..?निकालानंतर महापौरपदासाठी चुरस झाल्यास एकमेकांच्या चिन्हांवर लढवलेल्या उमेदवारांचा भाजप-शिंदेसेनेला फटका बसू शकतो. कोल्हापूरचा पहिला महापौर करण्यासाठी या दोन्ही पक्षात चुरस लागली आहे. जागा वाटपात त्याचे प्रतिबिंब उमटले आहे. त्यामुळे पदाधिकारी निवडताना एकेक जागा महत्त्वाची असते. शिवाय त्या त्या भागात पक्ष आणि चिन्ह रुजवण्यासाठी केलेले काम सगळे वाया जाते.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Election: BJP, Shinde Sena Lose Symbols; Congress Dominates 15 Wards

Web Summary : In Kolhapur election, BJP and Shinde Sena missed symbols in some wards due to alliance seat-sharing. Congress has candidates in all four spots in 15 wards. Internal competition could affect post-election dynamics.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेcongressकाँग्रेस