शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पोलिसांनी दिली भाऊबिजेची ओवाळणी, चोरीस गेलेले साडेसात लाखांचे दागिने दिले परत मिळवून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 18:35 IST

हुपरी : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले )येथील चंद्रकांत उर्फ आप्पासो बजरंग जाधव व शिवशांत बाळासाहेब माळी यांच्या घरांमध्ये झालेल्या चोरी ...

हुपरी : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले )येथील चंद्रकांत उर्फ आप्पासो बजरंग जाधव व शिवशांत बाळासाहेब माळी यांच्या घरांमध्ये झालेल्या चोरी प्रकरणांतील चोरीस गेलेले सुमारे साडेसात लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हुपरी पोलिसांनी दिपावली पाडवा सणानिमित्त परत त्यांच्या ताब्यात दिले. तर तिघा चोरट्यांना जेरबंद केले. प्रेमचंद उर्फ टल्ल्या राहुल कांबळे (वय १९) राजू फैजल काळे (४० रा. दोघेही दावतनगर कबनूर) व रोहन नारायण पवार (२०, रा. लक्ष्मीनगर कबनूर) अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत. पोलिस निरीक्षक किशोर शिंदे व उपनिरीक्षक गणेश खराडे यांनी चोरीस गेलेले सौभाग्य अलंकार परत आम्हाला मिळवून देवुन भाऊबिजेची खरीखुरी ओवाळणी दिल्याची प्रतिक्रिया शुभांगी चंद्रकांत उर्फ आप्पासो जाधव यांनी व्यक्त केली. चंद्रकांत उर्फ आप्पासो बजरंग जाधव व शिवशांत बाळासाहेब माळी यांच्या घरांमध्ये दोन महिन्यांपूर्वी चोरी झाली होती. जाधव यांच्या घरांतील  ४ लाख ६२ हजार ५०० रूपये व शिवशांत बाळासाो माळी यांच्या घरांतील २ लाख ६८ हजार ५९९ असे मिळून ७ लाख ३१ हजार रूपये किमतीचे विविध प्रकारचे सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. पोलिस निरीक्षक किशोर शिंदे व उपनिरीक्षक गणेश खराडे यांनी या गुन्ह्याचा तपास करून या प्रकरणी प्रेमचंद उर्फ टल्ल्या राहुल कांबळे, राजू फैजल काळे व रोहन नारायण पवार या चोरट्यांना जेरबंद करून त्यांच्याकडून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला होता. चोरट्यांकडून जप्त करण्यात आलेले हे सोन्याचे गंठण,  लक्ष्मी हार, नेकलेस,चेन असे सर्व दागिने वरिष्ठांच्या परवानगीने परत तक्रारदारांच्या ताब्यात देण्यात आले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस