शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शेळी-मेंढी पालन संस्थेचे आठ वर्षे वैधानिक लेखापरीक्षणच झाले नाही, पिग्मी फसवणुकीवरून ढकलाढकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 11:57 IST

संस्थेच्या अध्यक्षांसह संचालक मंडळास नोटीस काढण्यात आली आहे

कोल्हापूर : वडगाव परिसरातील पिग्मीधारकांची सुमारे ५० लाखांहून अधिक रक्कम अडकलेल्या मिणचे (ता. हातकणंगले) येथील महालक्ष्मी भटकी जमात शेळी-मेंढी पालन उत्पादक संस्थेचे २०१८ पासून वैधानिक लेखापरीक्षण झालेले नाही, की त्या संस्थेची निवडणूक... मग या काळात सहकार खाते काय करत होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता या रकमेवरून पिग्मी एजंट व संस्थेचे पदाधिकारी यांच्यात जबाबदारीची ढकलाढकली सुरु झाली आहे. करवीर पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेतील गैरव्यवहारासारखाच आंधळा कारभार या संस्थेतही झाल्याचे दिसत आहे. या प्रकरणाची ३० जानेवारीला सकाळी ११.३० वाजता सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांनी सुनावणी ठेवली आहे. त्यासंबंधीची नोटीस संस्थेच्या अध्यक्षांसह संचालक मंडळास काढण्यात आली आहे. त्यावेळी पिग्मी एजंटाने केलेल्या तक्रारीचा खुलासा मागवला आहे.त्याच वेळेला या संस्थेचे १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२५ पर्यंतचे वैधानिक लेखापरीक्षण करण्यासाठी शासकीय लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात यावी व तसे आदेश काढावेत, असे पत्र मुंबईच्या लेखापरीक्षा मंडळ (पदुम) विभागास सहाय्यक निबंधकांनी पाठवले आहे.भ्रष्टाचाराची तक्रार होऊन पिग्मीधारकांचे पैसे मिळणे बंद झाल्यावर सगळे जागे झाले आहेत. मुळात शेळी-मेंढी पालन संस्थेने शेळ्या-मेंढ्यांची पैदास वाढावी यासाठी काम करणे अपेक्षित असताना ते लोकांची पिग्मी गोळा करण्याच्या मागे लागले आहेत.

सोयीस्कर दुर्लक्ष...ज्यांनी तक्रार केली आहे ते एजंट हे संस्थेच्या अध्यक्षांच्या घरातीलच आहेत. एजंटाने जे पैसे गोळा केले, ते लोकांनी संस्थेच्या नावावर दिले आहेत, त्या एजंटाकडे बघून नाही. असे असताना तो जमिनी घेत होता, गाड्या उडवत होता हे संस्थेच्या कसे लक्षात आले नाही? तो काय करत होता, हे आम्हाला माहीत नव्हते असे अध्यक्षांनी आता म्हणणे म्हणजे त्या एजंटाच्या चुकीवर पांघरुण घालण्यासारखेच आहे. तो रोज किती रक्कम गोळा करतो, तो नियमित भरतो का, लोकांना पैसे परत मिळतात का, हे पाहण्याची जबाबदारी संस्थाचालकांचीच होती, परंतु त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले गेले आणि आता संस्थेच्या मालमत्ता विकून पिग्मीधारकांचे पैसे परत देण्याची वेळ संस्थेवर आली आहे.