शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘के. पी.’ नी केले काँग्रेस नेत्यांचे स्वागत; दुसऱ्या दिवशी राज्य उत्पादन शुल्क दारात

By राजाराम लोंढे | Updated: June 22, 2024 15:11 IST

'बिद्री' साखर कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा : डिस्टलरी प्रकल्पाच्या कागदपत्रांची केली तपासणी

कोल्हापूर :  बिद्री  (ता. कागल) येथील  दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पावर राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे यांच्याकडून काल, शुक्रवारी रात्री छापा टाकण्यात आला. यावेळी प्रकल्पाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. दोनच दिवसापुर्वी कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार  के. पी. पाटील यांनी काँग्रेसचे नूतन खासदार शाहू छत्रपती व जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचे मुदाळ गावात जोरदार स्वागत केले होते. त्यानंतर लगेचच राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी दारात आल्याने या कारवाईला राजकीय वास आहे का? याची चर्चा ‘बिद्री’ परिसरात सुरु झाली आहे.  बिद्री साखर कारखान्याचे प्रतिदिन साठ हजार केएलपीडी क्षमतेच्या डिस्टलरी प्रकल्पाची उभारण्याचे काम सुरु आहे. सुरवातीपासूनच १३० कोटी रुपयांचा हा प्रकल्प सत्ताधारी व विरोधी गटाच्या आरोप-प्रत्यारोपांनी चर्चेत आहे. प्रकल्पाचे इरादापत्र, अन्य परवानग्या व कर्ज यांमुळे  नुकत्याच झालेल्या कारखान्याच्या निवडणूकीतही हा मुद्दा गाजला होता.  या निवडणूकीत के. पी. पाटील यांनी एकहाती सत्ता कायम राखत विरोधकांना चारीमुंड्या चित केले होते.

लोकसभा निवडणूकीत के. पी. पाटील हे महायुती आघाडीच्या सोबतच होते. पण ‘राधानगरी’ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजय मंडलीक यांना मताधिक्य मिळाले नाही. त्यातच खासदार शाहू छत्रपती व सतेज पाटील यांचे कमानी घालून स्वागत केल्याने के. पी. पाटील हे काँग्रेसमध्ये जाणार याची चर्चा सुरु होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘बिद्री’ कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेली कारवाईला राजकीय वास आहे का? याची चर्चा सध्या सुरु आहे.

शुक्रवारी रात्रभर तपासणी..डिस्टलरी प्रकल्पाबाबत कारखान्याचे कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांच्यासह संबधित अधिकाऱ्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला सविस्तर माहीती दिली. शुक्रवारी रात्रभर तपासणी झाल्यानंतर शनिवारी सकाळी आठ वाजता पथक गेले.

प्रकल्पातील त्रुटीची चौकशी?डिस्टलरी प्रकल्पाबाबत विरोधकांनी रान उठवले होते. प्रकल्पात काही त्रुटी असल्याचा आरोप त्यांचा होता. त्या अनुषंगानेच चौकशी झाल्याचे समजते.

कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन त्याची उत्पादन चाचणी सुरु आहे. पण काल उत्पादन शुल्कच्या पथकाने प्रकल्पाला अचानक भेट देऊन तपासणी केली. याचा अहवाल ते आपल्या वरिष्ठांना देतील. हा अहवाल आपल्याला मिळाल्यानंतर त्याबाबत योग्य तो खुलासा करण्यास कारखाना प्रशासन सक्षम आहे. - के. पी. पाटील, अध्यक्ष बिद्री साखर कारखाना.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेK P. Patilके. पी. पाटीलExcise Departmentउत्पादन शुल्क विभाग