शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

स्फोटाचा आवाज अन् धुराच्या लोटांमुळे भरली धडकी, दुबईहून कोल्हापुरातील हुपरीत परतलेल्या पर्यटकांनी सांगितला थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 12:28 IST

सहल आयोजकांनी प्रवाशांची गैरसोयीबद्दल माफी मागितली आणि एक हजार दिराम कुपन भेट दिले

हुपरी : सहलीसाठी दुबईला गेलो, पाच दिवस आनंदात गेले. मात्र शनिवारपासून आम्ही राहिलेल्या हॉटेलच्या परिसरात धुराचे लोट पसरले. विमानतळ एक किलोमीटर होते. हवाई हल्ले सुरू झाले. मिसाइल हवेतच नष्ट होत होते. मात्र, सकाळी दात घासताना मोठा आवाज झाला आणि पोटात गोळा उठला. शंभर फुटांवर मिसाईलचे अवशेष पडल्याने आम्ही घाबरलो होतो, असा थरारक अनुभव हुपरीतील जोतिबा कणसे आणि राजेंद्र हातकर यांनी सांगितला. दुबईत अडकलेला २५ जणांचा ग्रुप मंगळवारी हुपरीत परतला. यानंतर अनेकांनी आँखो देखा हाल सांगितला.या पर्यटकांनी सांगितले की, संयुक्त अरब अमिरातीवर संकटांचे ढग दाटून आले होते. सकाळी ७ वाजता समोर ड्रोनचा हल्ला झाला अन् धुराचे लोट पसरले. दुपारी १२ वाजता जेवायला जाताना पुन्हा हल्ला झाला, पाचशे फुटांवर अवशेष पडले आणि मनात हुरहूर सुरू झाली. सायंकाळी ४ वाजता आणि पहाटे ४ वाजता मोठा आवाज झाला. भीतीने गाळण उडाली. पोरंबाळं सोबत आहेत, पुढे काय होणार, असे विचार येऊ लागले.स्थानिक प्रशासनाने हायअलर्ट जारी केला होता. रात्री काळजाची धडधड वाढली. आणीबाणीचे संदेश यायला सुरुवात झाली. ‘आहात तिथेच सुरक्षित रहा, बाहेर पडू नका, घाबरू नका’, असे प्रशासनाचे आवाहन होते, आणि आम्ही देवाची प्रार्थना सुरू केली. विमानतळावर हल्ला झाल्याने दुबईतील उड्डाण बंद झाले होते. स्थानिक प्रशासनाने हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बुर्ज खलिफा परिसरातील हॉटेल रिकामी केली होती. तेथील सरकारने बाहेरील नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले.

वाचा : आखाती देशात अडकले २०७ कोल्हापूरकर, २३ जण सुखरूप परतलेआम्ही ग्रुपमधील पंचवीसजण एकमेकांना धीर देत राहिलो. घरातील लोकांना परिस्थितीची माहिती दिली. शिवसेनेचे पक्ष प्रतोद रोहित शेटे यांच्याशी संपर्क केला. त्यांनी ही बाब तत्काळ खासदार धैर्यशील माने यांना सांगितली. परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क सुरू झाला. कोल्हापुरातील आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. प्रसाद संकपाळ यांनी संबंधित विभागाचा पाठपुरावा केला. अबुधाबी येथील विमान वाहतूक सुरू झाली. रात्री स्थानिक वेळेनुसार साडेचार वाजता तेथून पहिलेच विमान भारताच्या दिशेने उड्डाण केले आणि आम्ही टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.सहल आयोजकांनी प्रवाशांची गैरसोयीबद्दल माफी मागितली आणि एक हजार दिराम कुपन भेट दिले. याचे भारतीय मूल्य २६ हजार रुपये इतके होते. रात्री साडेआठच्या सुमारास मुंबईत पोहोचलो आणि आनंदाने भारावून गेलो. पहाटे हुपरी शहरात दाखल झालो. हा क्षण अविस्मरणीयच क्षण आहे.२५ जणांचा ग्रुपजोतिराम कणसे, कमल कणसे, शीतल बारगे, जयश्री बारगे, समरजीत बारगे, तुकाराम राऊत, छाया राऊत, राजेंद्र हतकर, सुनीता हतकर, बाळासाहेब हतकर, सुमन हतकर, विजय धनवडे, मंगल धनवडे, प्रशांत माळी, प्रियांका माळी, श्रीहरी माळी, प्राजक्ता माळी सर्व रा. हुपरी, प्रकाश जाधव, सविता जाधव रा. पट्टणकोडोली, राजेंद्र अडविकोट, कांचन अडविकोट, सुरेश दराडे, निर्मला दराडे रा. पुणे हे यात्रेकरू दुबईत अडकले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Tourists Describe Dubai Attack: Missiles, Fear, and Relief.

Web Summary : Kolhapur tourists recount harrowing Dubai experience: missile attacks, fear, and eventual relief upon returning home. They described explosions and constant worry for their safety, highlighting the local government's support and eventual return.