शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: नेतृत्व योग्य नसल्यानेच ‘हमीदवाडा’, ‘भोगावती’, ‘कुंभी’ची स्थिती बिकट; अजित पवार यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 19:08 IST

राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील राज्यातील संस्था आदर्शवत

गारगोटी : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील ‘केडीसीसी’, ‘गोकुळ’, कोल्हापूर बाजार समिती या संस्थांचा कारभार आदर्शवत आहे. के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील ‘बिद्री’ साखर कारखाना राज्यातील पहिल्या पाच कारखान्यांत आहे. नेतृत्व योग्य असले की संस्था बळकट होतात, चुकीच्या नेतृत्वामुळे संस्था रसातळाला जातात. ‘बिद्री’च्या कार्यक्षेत्रातील ‘भोगावती’, ‘हमीदवाडा’, ‘कुंभी’, ‘गडहिंग्लज’, ‘आजरा’ या कारखान्यांची अवस्था बिकट आहे. आठ-नऊ महिने कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत, हे फार चांगले नसल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

मुदाळ (ता. भुदरगड) येथे माजी आमदार के. पी. पाटील यांनी जाहीर सभेत राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश केला. त्या सभेत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, राज्यातील सहकारी सूतगिरण्या अडचणीत आल्या असताना ‘हुतात्मा’ सूतगिरणी आर्थिकदृष्टया सक्षम आहे. ‘गोकुळ’ दूध संघाने तर २० लाख लिटरचा टप्पा गाठला आहे. राज्यातील आदर्शवत सहकारी संघ आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेतृत्वाखाली उत्तमप्रकारे संस्था चालवल्या जातात.कितीही मशाली पेटवा; हदयात ‘राष्ट्रवादी’चके. पी. पाटील यांनी कितीही मशाली पेटवल्या तरी त्यांच्या हातात घड्याळ आणि हदयात राष्ट्रवादी असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

‘के. पी.’-‘ए. वाय.’ वादाचे ऑपरेशन करूके. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांच्यामुळेच हसन मुश्रीफ जिल्ह्याचा नेता झाला. याची जाणीव मला असून, त्यांच्यातील वाद मिटवणारच. ‘के. पी.’नी कितीही विरोध केला तरी मी आग्रह सोडणार नाही. दोघांमधील वादाच्या मुद्याचे ऑपरेशन करू, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेAjit Pawarअजित पवार