शहरं
Join us  
Trending Stories
1
Goregaon Fire: गोरेगावच्या भगतसिंग नगरमध्ये घराला भीषण आग; एकाच कुटुंबातील तिघांचा गुदमरून मृत्यू
2
वाद शिंदे सेनेशी, अन् नाईकांच्या सोसायटीत उद्धवसेनेला 'नो एन्ट्री'; वनमंत्र्यांच्या भावाने रोखल्याचा आरोप
3
"ट्रम्प यांनी नेतन्याहूंचे अपहरण करावे", पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची जीभ घसरली! इस्रायलने दिले उत्तर
4
NSE आणि BSE मध्ये शनिवारी ट्रेडिंग; वीकेंडला ट्रेडिंग सेशनची गरज का भासली, SEBI चा काय आहे आदेश?
5
Nashik Municipal Election 2026 : भाजप निष्ठावंतांना चुचकारण्याची ठाकरेंची खेळी, विकासापेक्षा राजकीय टीका-टिप्पणीवर भर
6
Tata च्या 'या' कंपनीनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे स्टॉक?
7
मालकासाठी आयुष्य झिजवलं, पण त्याने मुलाच्या लग्नाला बोलावलं नाही; ६० वर्षीय वृद्धाची पोलीस ठाण्यात धाव
8
कोट्यवधींची गुंतवणूक, १६ लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती; मुंबईसाठी CM फडणवीसांचा अजेंडा
9
"पाळी आली असेल तर पुरावा दाखव", उशीर झाल्याने लेक्चरर्सचे टोमणे; धक्क्याने विद्यार्थिनीचा मृत्यू
10
Sukanya Samriddhi Yojana Calculator: 'या' स्कीममध्ये तुमच्या मुलीसाठी उभा करू शकता ४७ लाख रुपयांचा फंड; सरकार देतेय ८.२% चं व्याज, जाणून घ्या
11
जयपूरमध्ये कारचं मृत्यूतांडव! रेसिंगच्या नादात १६ जणांना चिरडलं; एकाचा जागीच मृत्यू, शहरात खळबळ
12
Bhogi Festival 2026: खेंगट, बाजरीची भाकरी आणि लोणी; संक्रांतीच्या आधी भोगी का महत्त्वाची?
13
सुझुकीने अखेर ईलेक्ट्रीक स्कूटर e-Access लाँच केली, ९५ किमी रेंजसाठी किंमत एवढी ठेवली की...
14
"मी गरीब आहे, मला डॉक्टर व्हायचंय..."; मुख्यमंत्र्यांना भेटता न आल्याने विद्यार्थिनीला कोसळलं रडू
15
ट्रम्प टॅरिफबाबत अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात काय-काय झालं? भारतावर किती परिणाम, जाणून घ्या
16
पाकिस्तानच्या कुरापती सुरूच! सांबाच्या फ्लोरा गावात ड्रोनने पाडलं पॅकेट; बीएसएफने उधळला पाकचा डाव
17
जपानच्या अधिकाऱ्याचा फोन चीनच्या विमानतळावर चोरीला गेला; अणुऊर्जा प्रकल्पांसह अत्यंत गोपनीय माहिती लीक होण्याचा धोका...
18
परभणी-जिंतूर मार्गावर पहाटे भीषण अपघात; कीर्तनाहून परतणाऱ्या तीन वारकऱ्यांचा मृत्यू
19
डोनाल्ड ट्रम्प यांची तेल कंपन्यांसोबत बैठक, अमेरिका भारताला व्हेनेझुएलाचे तेल देण्यास तयार; पण एका अटीवर...
20
भयंकर प्रकार! 'द राजा साब'च्या स्क्रीनिंगदरम्यान प्रभासच्या चाहत्यांनी कागदाचे तुकडे जाळले, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीत मुरब्बी उमेदवारांसोबत नवख्यांची टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 14:21 IST

माजी नगराध्यक्ष, सभापती, नगरसेवक एका पारड्यात, विरुद्ध माजी नगरसेविकेसह अन्य उमेदवारांची लढत

अतुल आंबीइचलकरंजी : प्रभाग क्रमांक ४, ५ व ६ मध्ये एक माजी नगराध्यक्ष, एका उपनगराध्यक्षाची पत्नी, पाच माजी सभापती आणि आठ माजी नगरसेवक असे मातब्बर महायुतीकडून निवडणूक रिंगणात उभे आहेत. विरोधात एक माजी नगरसेविका आणि एका माजी नगराध्यक्षाचा पुत्र अपक्ष उभा आहे. अन्य नवख्या उमेदवारांना घेऊन शिव-शाहू आघाडी टक्कर देत आहे.महायुती विरुद्ध शिव-शाहू आघाडी अशी थेट लढत या तीनही प्रभागांत चुरशीने सुरू असली तरी त्यामध्ये काही जागांवर उद्धवसेना, वंचित बहुजन आघाडी, आप आणि अपक्ष यांच्याकडूनही तगडा प्रचार सुरू आहे.प्रभाग क्रमांक ४ अ मध्ये शिंदेसेनेकडून माजी सभापती दिलीप झोळ, तर शिव-शाहू आघाडीकडून उद्धव सेनेचे शहर अध्यक्ष सयाजी चव्हाण यांच्यात काटे की टक्कर सुरू आहे. शिंदेसेना विरुद्ध उद्धव सेना अशा या दोघांच्या लढतीत जनता कोणत्या पक्षाला कौल देते, हे स्पष्ट होणार आहे. ब मध्ये मोनाली मांजरे विरुद्ध दीपाली अथणे यांची लढत आहे. दोन्ही गटांत दोन-दोन अपक्षही आपले नशीब आजमावत आहेत. कमध्ये मनीषा कुपटे आणि सुलोचना पाटील यांची एकास एक लढत असून, डमध्ये माजी सभापती मनोज हिंगमिरे विरुद्ध सागर कुंभार यांच्यात चुरस सुरू आहे.प्रभाग ५ अ मध्ये माजी नगरसेविका शकुंतला मुळीक यांचे पुत्र सतीश मुळीक विरुद्ध सतीश लाटणे यांच्यात लढत असून, १ अपक्ष उमेदवारही उभा आहे. ब मध्ये वैशाली पोवार आणि माजी नगरसेविका मीना बेडगे एकास एक, क मध्ये माजी सभापती जुलेखा पटेकरी विरुद्ध अनुराधा भोसले, तर डमध्ये माजी नगरसेवक सुनील पाटील (भाजप) विरुद्ध शिवाजी पाटील (उद्धवसेना) आणि अमोल सूर्यवंशी (शिव-शाहू) या तिघांसह पाच अपक्ष रिंगणात आहेत.प्रभाग ६ अ मध्ये माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा अलका स्वामी (भाजप) विरुद्ध उद्धवसेनेचे अनिल झाडबुके, शिव-शाहूचे बापू गेजगे, वंचित बहुजनचे हेमंत शिंदे आणि एक अपक्ष लढत आहेत. ब मध्ये माजी नगरसेविका किरण खवरे विरुद्ध प्रियांका बेलेकर, एक अपक्ष उभे आहेत. कमध्ये माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन यांची पत्नी विजया महाजन विरुद्ध सुजाता पोवार यांची एकास एक लढत असून, डमध्ये माजी सभापती विठ्ठल चोपडे विरूद्ध शिव-शाहूचे अभय बाबेल, उद्धवसेना साहील कलावंत, आपचे यशवंत भंडारे आणि एक अपक्ष रिंगणात आहेत. तीनही प्रभागांतील अपक्षांच्या मतांची बेरीज-वजाबाकी अनेक उमेदवारांना धक्कादायक निकाल देऊ शकते.प्रभाग ५ डमध्ये ५ अपक्षप्रभाग ५ डमध्ये भाजप, उद्धवसेना, शिव-शाहू आघाडी यांच्यासह तब्बल ५ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. त्यांच्या मतांचे ध्रुवीकरण विजयाचा गुलाल बदलणार का? याकडे लक्ष लागले आहे.पती-पत्नी आणि मुलगाप्रभाग क्रमांक ५ अ, क आणि ड या तीन ठिकाणी सचिन भरते, त्यांची पत्नी प्रतीक्षा भरते आणि मुलगा सुमित भरते असे घरातील तिघेजण निवडणुकीला उभारले आहेत. सुरुवातीपासूनच त्यांच्या उमेदवारीची चर्चा रंगली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ichalkaranji Municipal Election 2026: Experienced vs. New Faces Clash

Web Summary : Ichalkaranji's wards 4, 5, and 6 see a Mahayuti of experienced politicians challenged by the Shiv-Shahu alliance and independents. Key contests include seasoned leaders versus fresh candidates, with potential upsets from independent voters influencing results.
टॅग्स :Ichalkaranji Municipal Corporation Electionइचलकरंजी महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Mahayutiमहायुती