पन्हाळा : पन्हाळगडावर असलेल्या छत्रपतींच्या मंदिरातून शिवजयंतीनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य शिवभक्त शिवज्योती आपापल्या गावी घेऊन जातात. हीच पन्हाळगडावरून जाणारी शिवज्योत प्रत्येकाच्या मनामध्ये शिवविचार जागृत ठेवेल असे प्रतिपादन आमदार डॉ. विनय कोरे यांनी केले. ते केंद्र शासन आयोजित राज्यव्यापी "जय शिवाजी जय भारत" पदयात्रा कार्यक्रमात बोलत होते.जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वराज्याची राजधानी असलेल्या पन्हाळगडावर छत्रपतींची ३९६ वी जयंती साजरी करण्याचा मान मिळाल्याबद्दल केंद्र शासनाचे आभार मानले. पोलिस अधीक्षक योगेश गुप्ता हे उपस्थित होते."जय शिवाजी जय भारत" पदयात्रेला सकाळी साडेआठ वाजता आमदार डॉ. विनय कोरे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक योगेश गुप्ता यांच्या हस्ते ध्वज फडकावून शिवमंदिरापासून सुरुवात झाली. संपूर्ण गडफेरी करत मयुर उद्यान येथे पदयात्रा समाप्त झाली. यानंतर गणेशोत्सवप्रसंगी घेतलेल्या कार्यक्रमातील विविध बक्षिसे देण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्यावतीने नगरपरिषद सांस्कृतिक सभागृहात रक्तदान शिबिर घेतले तर नगरपरिषद कार्यालयात युवा प्रतिष्ठान पन्हाळा यांचेवतीने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. पन्हाळगडावर शिवजयंती निमित्त महिलांनी पाळणा गित गाऊन शिवजयंती साजरी केली. पुरुषांच्या खेळाने लक्ष वेधून घेतलेसांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी मर्दानी खेळ, पाळणा गीत, लेझीम, लाठीकाठी बरोबरच पन्हाळगडावरील विजयालक्ष्मी भोसले, हिच्या भाषणाने उपस्थितांची मने जिंकली.
शिवज्योत नेण्यासाठी शिवभक्तांची गर्दी‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या जयघोषाने पन्हाळगड शिवमय बनला आहे. पन्हाळगडावरून शिवज्योत नेण्यासाठी शिवभक्तांनी गडावर गर्दी केली होती. पुणे, सांगली सातारा, कोल्हापूरसह कर्नाटक राज्यातील शिवभक्तांची शिवज्योत नेण्यासाठी गर्दी झाली होती.
Web Summary : Shivjayanti celebrated at Panhalgad with enthusiasm. MLA Vinay Kore highlighted the importance of Shivjyot in spreading Shivvichar. Various events including blood donation camps and cultural programs were organized.
Web Summary : पन्हालागढ़ में शिवजयंती उत्साह से मनाई गई। विधायक विनय कोरे ने शिवविचार फैलाने में शिवज्योति के महत्व पर प्रकाश डाला। रक्तदान शिविरों और सांस्कृतिक कार्यक्रमों सहित विभिन्न कार्यक्रम आयोजित किए गए।