शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शिरोळ तालुक्यात गाळमिश्रित वाळू उपसा सुरू, स्वस्तात वाळू मिळणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 18:21 IST

पाटबंधारे, महसूल ठेवणार नियंत्रण

संदीप बावचेजयसिंगपूर : पुराला कारणीभूत ठरणाऱ्या कृष्णा नदीपात्रातील गाळ काढण्याची प्रक्रिया शिरोळ तालुक्यात सुरू झाली आहे. गाळाबरोबरच गाळमिश्रित वाळूदेखील उपसा केली जाणार आहे. शिवाय स्वस्त दरातील शासनाचे धोरणदेखील राबविले जाणार आहे. ६०० रुपये ब्रास वाळू घरकुल लाभार्थ्यांसह ऑनलाइन नोंदणी करणाऱ्यांना मिळणार आहे. तालुक्यात सहा ठिकाणी उपसा केला जाणार आहे. गाळमिश्रित वाळू उपसा करून डेपोच्या ठिकाणी ती टाकली जाणार असून, त्यावर पाटबंधारे व महसूल विभागाचे नियंत्रण असणार आहे.राज्य शासनाने जाहीर केलेल्या वाळू धोरणानुसार तालुक्यात गाळमिश्रित वाळू उपशाचे धोरण राबविले जात आहे. गेल्या आठ महिन्यापासून हे धोरण कागदावरच होते. शासनाने अडीच वर्षांपूर्वी स्वस्तात ६०० रुपये वाळू देण्याचे धोरण जाहीर केले होते, मात्र, प्रत्यक्षात कृष्णा नदीपात्रातील गाळ व गाळमिश्रित वाळू उपशाची निविदा प्रक्रिया मार्च २०२३ मध्ये पूर्ण झाली होती. लोकसभा निवडणूक, पावसाळा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीमुळे त्याबाबतची कार्यवाही झाली नव्हती. शेडशाळ, कवठेगुलंद, अर्जुनवाड व घालवाड या ठिकाणी गाळमिश्रित वाळू काढण्याचे धोरण आहे. जलसंपदा विभागाच्या आराखड्यानुसार हे धोरण राबविले जात आहे. आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत हे धोरण असल्यामुळे यांत्रिकी बोटीने उपसा केला जाऊ शकतो. त्यासाठी हरित लवादाच्या परवानगीची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले.

घरकुल लाभार्थ्यांना गुड न्यूजसर्वांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाकडून विविध घरकुल योजना राबविल्या जात आहेत. मात्र या लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्याचे धोरण आतापर्यंत कागदावरच राहिले आहे. गाळमिश्रित वाळूच्या धोरणामुळे मोफत वाळूचा लाभ आता मिळणार आहे. त्यासाठी पंचायत समिती विभागाने महसूल विभागाकडे मागणी करावी लागणार आहे.

ऑनलाइन नोंदणीने मिळणार वाळूमोठा गाजावाजा करत शासनाने अडीच वर्षापूर्वी सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तात वाळू देण्याच्या धोरणाला मंजुरी दिली होती. स्वस्तातील वाळू मिळेल या आशेने अनेकांनी घरांची बांधकामे हाती घेतली. मात्र शासनाचे स्वस्तातील वाळू धोरण बोलाचाच भात बोलाचीच कढी या उक्तीप्रमाणेच दिसून आली होते. ऑनलाइन पद्धतीने वाळूची मागणी करणाऱ्यांना आता प्रतिब्रास ६०० रुपयांना वाळू मिळणार आहे.

शिरोळ तालुक्यात ज्याठिकाणी गाळ व गाळमिश्रित वाळू उपशाचे धोरण आहे त्याठिकाणची गाळमिश्रित वाळू डेपोच्या ठिकाणीच साठा करायचा आहे. ऑनलाइन नोंदणी करणाऱ्यांना ६०० रुपये ब्रासप्रमाणे वाळू मिळणार आहे. मात्र ती खरेदी करून चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई होईल. गाळमिश्रित वाळू उपशावर पाटबंधारे व महसूल विभागाचे नियंत्रण राहणार आहे. - आनंद पाटील, खनिकर्म अधिकारी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीfloodपूरsandवाळू