शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

Kolhapur: पंचगंगेचे प्रदूषण; ३४ वर्षांपासून घोषणांचेच सिंचन! पाणी दूषित करण्यास ८८ गावांचा हातभार

By समीर देशपांडे | Updated: April 21, 2023 12:33 IST

१९८९ मध्ये कोल्हापूरमध्ये मोठी काविळीची साथ आली. तेव्हापासून याबाबतच्या लढ्याला सुरुवात झाली. ३४ वर्षे झाली तरी हा प्रश्न अजूनही संपला नाही

समीर देशपांडेकोल्हापूर : एखादा प्रश्न भिजत कसा ठेवावा आणि दरवर्षी त्याबाबत नवनवीन घोषणा कशा कराव्यात याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न. कारण १९८९ मध्ये कोल्हापूरमध्ये मोठी काविळीची साथ आली. तेव्हापासून याबाबतच्या लढ्याला सुरुवात झाली. ३४ वर्षे झाली तरी हा प्रश्न अजूनही संपला नाही. असा एक-एक प्रश्न संपायला एक पिढी जाणार असेल तर हा विकास नेमका कोणत्या दिशेने चालला आहे हा खरा प्रश्न आहे.सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या जिल्ह्यातील कुंभी, कासारी, तुळशी, धामणी आणि भाेगावती या पंचगंगेच्या उपनद्या आहेत. या पाच नद्यांच्या प्रवाहातून करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथे संगम होतो आणि पंचगंगा नदीची निर्मिती होते. येथून ८१ किलोमीटरवर नृसिंहवाडी येथे पंचगंगा नदी कृष्णा नदीला मिळते. या दरम्यान उभारण्यात आलेले विविध उद्योग, कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी महापालिका, ८८ ग्रामपंचायती या कमी अधिक प्रमाणात या पंचगंगा प्रदूषणाला कारणीभूत आहेत.नेते अधिकाऱ्यांचे दुर्लक्षच कारणीभूत१९८९ मध्ये पंचगंगेच्या पाण्याबाबत विचारणा होऊ लागली तरी त्यावेळी इतके औद्योगिकीकरण वाढले नव्हते. पण नंतर लोकसंख्या वाढतच राहिली. औद्योगिकीकरण झाले. शहरांमध्ये लोकसंख्या केंद्रित होऊ लागली. अनेक पाणी योजनांच्या माध्यमातून माणसी रोज ४० लीटर पाणीपुरवठा होऊ लागला. साखर कारखान्यांचे डिस्टिलरी प्रकल्प उभे राहिले. एकीकडे हा सगळा विकास वेगाने होत असताना दुसरीकडे यातून निर्माण होणारे सांडपाणी रोखण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक होते. परंतु, तत्कालीन नेते आणि अधिकारी यांनी हा प्रश्न कधीच गांभीर्याने घेतला नाही आणि आता मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदने द्यायला सर्वपक्षीय झुंबड उडालेली पाहावयास मिळते.उपाययोजनांचे आदेश कागदावरच२०१२ मध्ये इचलकरंजीत काविळीच्या साथीमध्ये ८५ नागरिकांचा मृत्यू झाला आणि हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने यासाठी समिती नेमली आणि नियमित आढावा घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश दिले. तेव्हापासून विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली पंचगंगा प्रदूषणाच्या नियमित बैठका होतात. परंतु, प्रश्न अजूनही सुटत नाही. अजूनही दरवर्षी पाणी काळे होते, मग दुर्गंधी सुटते, मासे मरतात, बातम्या येतात, मग नेतेही येतात. भाषणे ठोकतात. पंचगंगा तशीच वाहते आहे. काही ठिकाणी जलपर्णीच्या उदराखालून काही ठिकाणी काळीकुट्ट होऊन.

हे आहेत सांडपाण्यासाठी जबाबदार

  • अ. न. जबाबदार घटक विनाप्रक्रिया नदीत मिसळणारे पाणी प्रतिदिन द.ल.लि.
  • कोल्हापूर महापालिका  -   ०६
  • इचलकरंजी महापालिका   -   २०
  • ग्रामपंचायती ८८   -  ७१.३३

मैला जात नसल्याचा दावाकोल्हापूर शहराला रोज १३० द.ल.लि. प्रतिदिन पाणीपुरवठा केला जातो. यातून १०४ द.ल.लि. सांडपाण्याची निर्मिती होते. यातील ९९ द.ल.लि.वर प्रक्रिया केली जाते. तर ६ द.ल.लि. सांडपाणी पाच नाल्यांतून पंचगंगा नदीत मिसळते. परंतु, या सांडपाण्यातून नदीत मैला मिसळत नसल्याचा दावा कोल्हापूर महापालिका करते तो किती खरा आणि खोटा हा संशोधनाचा विषय आहे.

बैठकांवर बैठकाउच्च न्यायालयाने सांगितले आहे म्हणून विभागीय आयुक्त कोल्हापूरमध्ये येतात. बैठका घेतात. महापालिका, जिल्हा परिषद, इचलकरंजी महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पाटबंधारे विभागाचे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात येतात. मागचा आढावा घेतला जातो. उरलेले काम किती दिवसात करणार असे विचारले जाते आणि बैठक संपून जाते. या गतीने पंचगंगा नदीचे प्रदूषण संपवताना नव्याने काही प्रश्न निर्माण हाेणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषण