शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

कोल्हापुरात पावसाळ्यापूर्वी केलेले पॅचवर्क गेले वाहून, मुरमाच्या पॅचवर्कमुळे रस्त्यांवर चिखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 14:00 IST

कामातील दर्जा पुन्हा आला समोर

कोल्हापूर : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शहराच्या अनेक भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले असून ठिकठिकाणी पाणी साचून राहिलेले आहे. महापालिका सार्वजनिक बांधकाम व आरोग्य विभागाने गुरुवारी दिवसभर मुरूम टाकून खड्डे भरण्यास सुरुवात केली तर रस्त्यावर साचून राहिलेल्या पाण्याला वाट करून देण्याचा प्रयत्न केला.महापालिका बांधकाम विभागाने यावर्षी पॅचवर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु नेहमीच्या अनुभवानुसार ही पॅचवर्कची कामे दर्जेदार झाली नाहीत. यावर्षीच्या पहिल्याच पावसात ही पॅचवर्क उखडले आहेत. आईसाहेब महाराज पुतळ्यापासून ते बिंदू चौक माधुरी बेकरीपर्यंतचा रस्त्यावरील पॅचवर्क खराब झाली आहेत. अशीच परिस्थिती लुगडी ओळ रस्त्याची झाली आहे.गोखले कॉलेज ते रेणुका मंदिर चौक तसेच हॉकी स्टेडियम जवळील चौकात खड्डे पडले आहेत. रेणुका मंदिर चौकात येणाऱ्या पाण्याचा लवकरच निचरा होत नसल्याने तेथील आधी केलेले पॅचवर्क उखडून गेले आहेत. साने गुरुजी वसाहत रस्त्यावरून पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत थेट क्रेशर चौकात येते. त्यामुळे या चौकातील पॅचवर्क पार धुवून गेल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. रंकाळा टॉवर चौकातही असेच खड्डे पडलेले आहेत.मिरजकर तिकटी चौक ते पाण्याचा खजिना हा रस्ता तर आता पाणंद रस्ता झाला आहे. या रस्त्यावर जलवाहिनी, ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी खुदाई करण्यात आली होती. त्याचे पुनर्पृष्ठीकरण वेळेत न केल्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. पाण्याच्या खजिन्यापासून ते संभाजीनगर पर्यंतही रस्त्यावर लहान मोठे खड्डे पडले आहेत. संभाजीनगर येथे रस्त्यावरच पाणी साचून राहिते. पाणी जाण्यास तेथे वाव नाही.दरम्यान, गुरुवारी महापालिका सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे चारही विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत सर्वच रस्त्यावरील खड्डे मुरूम टाकून बुजविण्यास सुरुवात केली आहे. परंतु मुरूम टाकल्याने तत्काळ खड्डा भरतो, परंतु नंतर पावसाच्या पाण्याने त्यावर चिखल तयार होत आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर साचून राहणाऱ्या पाण्याला वाट करून देण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी छोट्या चरी काढून पाण्याला वाट करून दिली जात आहे.

ड्रेनेज लाइन चोकअपपावसाळ्यात ड्रेनेज लाइन चोकअप होण्याचा नेहमीचा अनुभव यंदाही येत आहे. जेट मशीनची कमतरता असल्याने पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्वच ड्रेनेज लाइन स्वच्छ करता आलेल्या नाहीत. परिणामी ठिकठिकाणी त्या तुंबल्याने रस्त्यावर मैलामिश्रित सांडपाणी वाहत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरroad transportरस्ते वाहतूक