शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: भगवान महावीर अध्यासनातून उलगडणार जैन धर्माचे तत्त्वज्ञान, देशातील पहिले अध्यासन केंद्र

By पोपट केशव पवार | Updated: April 25, 2025 18:53 IST

प्रयोगातून मानवी मूल्यांची पायाभरणी : संशोधनातून चिकित्सा

पोपट पवारकोल्हापूर : सायंकाळी सहाच्या आत जेवण करा, जे आवश्यक आहे तेवढे घ्या, नको ते दुसऱ्यांना द्या, जीवनशैलीत कमीत कमी वस्तूंचा वापर करा हे जैन धर्माचे तत्त्वज्ञान जगभरातील नागरिकांसाठी कौतुकाचा विषय असला तरी आता हेच तत्त्वज्ञान अगदी पुराव्यानिशी संशोधन करून तौलनिकदृष्ट्या शिवाजी विद्यापीठातील भगवान महावीर अध्यासनातून मांडले जाणार आहे. महावीर अध्यासनाच्या प्रस्तावित नूतन इमारतीचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. या अध्यासनाची ही केवळ इमारत उभी राहत नाही तर मानवी मूल्यांच्या तत्त्वज्ञानाचा पाया यानिमित्ताने रचला जाणार आहे.विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव अध्यासनाजवळच विद्यापीठाने या इमारतीसाठी जागा दिली असून, दोन मजली इमारतीसाठी १३ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. यासाठी इमारत निधी समितीने एक कोटी ११ लाख रुपयांचा निधी देणगी स्वरूपात जमा केला. याच निधीतून पहिल्या टप्प्याचे काम करण्यात येणार आहे. या इमारतीत सभागृह, ग्रंथालय, संशोधकांसाठी खोल्या यासह विविध सुविधा असतील. उर्वरित कामासाठी शासनाकडे निधीची मागणी अध्यासनाने केली असून, तो निधी मिळाल्यानंतर पुढील काम करण्यात येणार आहे.

जागतिक दर्जाचे ध्यानकेंद्रसध्या स्पर्धेच्या युगात अनेकजण ताणतणावाखाली आहेत. त्यामुळे ध्यानधारणा करणे क्रमप्राप्त बनले आहे. समाजाची ही गरज ओळखून या अध्यासनामार्फत जागतिक दर्जाचे ध्यानकेंद्र उभारण्यात येणार आहे.

तौलनिक संशोधनावर भरजैन धर्माचे तत्त्वज्ञान आणि इतर धर्मांचे तत्त्वज्ञान यांचे तौलनिक संशोधन, अभ्यास या केंद्राच्या वतीने करण्यात येईल. जैन धर्माचा बौद्धिक दृष्टिकोन लक्षात घेऊन संशोधनात्मक लेखन, शिवाय तत्त्वज्ञानाची ओळख होण्यासाठी सोप्या भाषेतील साहित्य प्रसिद्ध करण्यात येणार आहे.त्या ७४ ग्रंथांचा होणार अभ्यासजैन धर्मात ७४ ग्रंथ आहेत. या ग्रंथांचा बारकाईने अभ्यास करून धर्माची चिकित्सा करण्यात येणार आहे. धर्मातील चालीरीती, पूर्वपरंपरा याची सध्याच्या परिस्थितीशी तुलना करून जे चांगले आहे ते स्वीकारणे आणि ज्याची आता गरज नाही ते सोडून देणे यावर हे अध्यासन मंथन करेल.

देशातील पहिले अध्यासन केंद्रविद्यापीठाने जागा देऊन समाजाच्या देणगीतून उभारण्यात येणारे हे देशातील पहिले केंद्र आहे. महावीर अध्यासनाची इमारत पूर्णत: इको फ्रेंडली असेल. शेजारील तलावातून येणारे वारे या इमारतीच्या सर्व खोल्यांमध्ये खेळेल अशा पद्धतीने या इमारतीचा आराखडा तयार केला आहे. २००४ साली सुरू झालेल्या अध्यासनामार्फत सध्या प्रमाणपत्र व पदविका कोर्स चालविले जातात. इमारत पूर्णत्वास गेल्यानंतर येथे पीएच.डी.सह विविध कोर्सेस सुरू करण्यात येणार आहेत.

महावीर अध्यासनाच्या नव्या इमारतीमधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे जैन शास्त्रावरील संशोधन करणारे केंद्र निर्माण होणार आहे. - डॉ. विजय ककडे, संचालक, महावीर अध्यासन केंद्र, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठ