येत्या निवडणुकीत जनताच खरी शिवसेना कोणाची हे दाखवेल : नीलम गोऱ्हे

By संदीप आडनाईक | Updated: September 29, 2022 19:41 IST2022-09-29T19:41:04+5:302022-09-29T19:41:39+5:30

विरोधकांना रोज काही ना काही आरोप करण्याची सवय आहे, परंतु शिवसेना त्यांना पुरून उरली

The people will show who is the real Shiv Sena in the coming elections says Neelam Gorhe | येत्या निवडणुकीत जनताच खरी शिवसेना कोणाची हे दाखवेल : नीलम गोऱ्हे

येत्या निवडणुकीत जनताच खरी शिवसेना कोणाची हे दाखवेल : नीलम गोऱ्हे

कोल्हापूर : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला नेहमी सामान्य माणूस येतो, यावेळी सामान्य माणूसच शिवतीर्थावर येईल. येणाऱ्या निवडणुकीत सामान्य माणूसच खरी शिवसेना कोणाची हे दाखवून देईल असे मत शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. नीलम गोऱ्हे यांनी आज, गुरुवारी कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या.

विरोधकांना रोज काही ना काही आरोप करण्याची सवय आहे, परंतु शिवसेना त्यांना पुरून उरली आहे, त्यावर अंतिम उत्तर जनताच निवडणुकीत देईल. त्यामुळे त्यांच्या फुटकळ प्रश्नांवर प्रतिक्रिया देणार नाही. बाळासाहेबांच्या सभेतही खांद्यावर बाळ घेऊन अनेक सामान्य माणसे, कार्यकर्ते, आणि पदाधिकारी येत होते, हे साऱ्यांनी पाहिले आहे. उद्धव साहेबांच्या सभेतही आणि आदित्य ठाकरेंच्या पुण्यातील दौऱ्यातही सामान्य माणूसच पुढे होता. यापुढेही सामान्य माणूसच शिवसेना सोडणार नसल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले.

शिवसेनेवर टीका नवीन नाही. यापूर्वीही अनेकांनी शिवसेनेवर आणि बाळासाहेबांवर टीका केल्या आहेत. आताही जे बाळासाहेब, उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करतात, त्यांना स्वतःची प्रसिद्धी मिळवायची आहे. पण त्यांनी स्वतःचे काम दाखवावे, स्वतःचे प्रकल्प उभे करावेत, ते करण्याऐवजी ते दुसऱ्यांवर टीका करतात हे दुर्देवी आहे असे मत गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

Web Title: The people will show who is the real Shiv Sena in the coming elections says Neelam Gorhe