शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: अवैध गर्भपात; साखरप्यातील डॉ. विजय गोपाळ अटकेत, रॅकेटमधील नववा आरोपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 12:18 IST

५०० रुपयांच्या किटसाठी त्याला तब्बल २४ हजार रुपये

कोल्हापूर : दोन महिन्यांपूर्वी क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथे उघडकीस आलेल्या अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात रॅकेटमधील नववा आरोपी डॉ. विजय गोपाळ नारकर (वय ६३, रा. साखरपा, ता. देवरुख, जि. रत्नागिरी) हा करवीर पोलिसांच्या हाती लागला. डॉ. नारकर याच्या दवाखान्यातून पोलिसांनीगर्भपाताच्या औषधांचा साठा जप्त केला. न्यायालयात हजर केले असता, त्याला सोमवारपर्यंत (दि. ११) पोलिस कोठडी मिळाली.याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आरोग्य विभाग आणि करवीर पोलिसांनी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथील एका घरात छापा टाकून कारवाई केली होती. त्या कारवाईत अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या रॅकेटचा भांडाफोड झाला. त्या गुन्ह्यात एका अधिकृत डॉक्टरसह एक बोगस डॉक्टर, टेक्निशिअन आणि एजंट अशा आठ संशयितांना अटक झाली होती. त्यांच्या चौकशीत साखरपा येथील डॉ. विजय नारकर याचे नाव समोर आले. अधिक चौकशीनंतर डॉ. नारकर याने आजवर अनेक महिलांचा अवैध गर्भपात केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी नारकर याला अटक केली.दवाखान्याच्या झडतीत गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा साठा पोलिसांच्या हाती लागला. डॉ. नारकर याच्याकडे रुग्णांना पाठवणारे एजंट आणि गर्भपाताची औषधे पुरवणारे वितरक पोलिसांच्या रडारवर आहेत. लवकरच त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली.

डॉ. नारकर ३५ वर्षांपासून वैद्यकीय सेवेतडॉ. नारकर याने बीएएमएस पदवी घेतली असून, गेल्या ३५ वर्षांपासून तो वैद्यकीय सेवेत सक्रिय आहे. कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांची त्याच्याकडे वर्दळ होती. अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या या रॅकेटमध्ये त्याचा महत्त्वाचा सहभाग असल्याचे तपासात स्पष्ट झाल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक युनूस इनामदार यांनी दिली.

२५ हजारांचा दरनारकर याच्याकडे गोपनीय पद्धतीने गर्भपाताची औषधे दिली जात होती. यासाठी तो रुग्णांकडून २५ हजार रुपये घेत होता. सुमारे ५०० रुपयांच्या किटसाठी त्याला तब्बल २४ हजार रुपये मिळत होते. त्याने आजपर्यंत किती गर्भपात केले आहेत, याची माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAbortionगर्भपातCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस