शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

उमेदवार जाहीर झाला की निकाल ठरवण्याचा कोल्हापूरकरांचा स्वभाव, लोकसभेला तब्बल १२ वेळा झाली एकास एक लढत

By विश्वास पाटील | Updated: April 10, 2024 13:02 IST

कोल्हापूरच्या जनतेच्या मनात निवडून द्यायवयाच्या उमेदवाराबाबत कायमच फारशी संदिग्धता नसते

विश्वास पाटीलकोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या एकूण सतरा निवडणुकांमध्ये तब्बल बारा वेळा एकास एक लढत झाली आहे. पाचवेळा तिसरा उमेदवार जरूर रिंगणात राहिला आहे परंतु त्याला स्पर्धेतील अन्य दोन उमेदवारांपेक्षा फारच कमी मते मिळाली आहेत. याचा अर्थ असा की कोल्हापूरच्या जनतेच्या मनात निवडून द्यायवयाच्या उमेदवाराबाबत कायमच फारशी संदिग्धता नसते. अनेकदा उमेदवारी जाहीर झाल्यावरच त्याचा निकाल बऱ्यापैकी स्पष्ट झालेला असतो. यंदाही दोन्ही मतदार संघांत तब्बल महिन्यापूर्वीच तसेच काहीसे वातावरण दिसत आहे.सन १९५२ व ५७ च्या निवडणुका दोन सदस्यीय पद्धतीने झाल्या. त्यामुळे कोल्हापूरने आतापर्यंत निवडणूका सतरा आणि खासदार १९ निवडले आहेत. कोल्हापूरचे वैशिष्टय असे की पक्षीय बंधन झुगारून त्यांने चांगल्या उमेदवाराला गुलाल लावला आहे. त्यामुळे दोनवेळा अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. कोल्हापूर हा अत्यंत जागरूक जिल्हा आहे. त्याने आतापर्यंत स्वत:चा विकास स्वत:च्या हिंमतीवर केला आहे. राजकीय नेतृत्व आपल्यासाठी काहीतरी करेल, अशा भ्रमात तो राहत नाही. आपल्या विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी तो दबावगट तयार करतो व सरकारला त्यानुसार भूमिका घ्यायला भाग पाडतो. त्याची जगण्याची रीतही रोखठोक असते हे किंवा ते अशी ती आक्रमक असते. तो प्रेम करतानाही हातचे राखून काय करत नाही आणि विरोध करतानाही टोकाला जातो. कोण निवडून येणार यापेक्षा कोण निवडून येणार नाही याचे गणित त्यांने अगोदरच मनांत पक्के केलेले असते. कोल्हापूर हा विरोधी विचारांचा जिल्हा आहे असे म्हटले गेले. कारण राज्यात, केंद्रात जे सत्तेत आहेत, त्यांच्या नेमका जनमताचा उलटा कौल त्यांने अनेकदा दिला आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, शेकापक्षाचा बालेकिल्ला असलेला हा जिल्हा एकेकाळी काँग्रेसच्या प्रभावाखालीही होता. डाव्या पुरोगामी विचारांच्या या जिल्ह्यात गेल्या निवडणुकीत प्रथमच उजव्या विचारांना जनतेने यश दिले.

कोणत्या पक्षाचे कितीवेळा झाले खासदारकाँग्रेस : १०राष्ट्रवादी काँग्रेस : ०३अपक्ष : ०२शेतकरी कामगार पक्ष : ०२शेड्युल्ड कास्ट फेडरेशन : ०१शिवसेना : ०१(पहिल्या दोन निवडणुकीमध्ये द्विसदस्यीय पद्धती असल्याने सतरा निवडणुका आणि १९ खासदार झाले आहेत)

कुणाला कितीवेळा मिळाली खासदारकीउदयसिंहराव गायकवाड (काँग्रेस) : ०५सदाशिवराव मंडलिक (काँग्रेस व राष्ट्रवादी) : ०४

कोल्हापूरच्या माणसांत राजकीय प्रगल्भता आहे. राजकीय भूमिकेचा विचार तो सामाजिक भूमिकेला जोडून करतो. कोल्हापूरने एकदा भूमिका घेतली की त्याचे प्रतिबिंब राज्यात उमटते. तसे अन्य जिल्ह्यांच्या बाबतीत घडत नाही. - प्रा.विलास रणसुभे, राज्यशास्त्राचे अभ्यासक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४kolhapur-pcकोल्हापूरPoliticsराजकारण