शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: वाईट नजरेने पाहतो म्हणून कामावरून काढला, ट्रॅक्टरचालकाने रागाने मालकाच्या पत्नीचा खून केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 14:15 IST

संशयितानेच दिला खुनाचा निरोप

पेठवडगाव / नवे पारगाव : घुणकी (ता. हातकणंगले) येथे जनावरे चारण्यासाठी गेलेल्या बेपत्ता महिलेचा खून झाल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. ट्रॅक्टरचालकाने कामावरून काढून टाकल्याच्या रागातून ट्रॅक्टरमालकाच्या पत्नीचा गळा आवळून अमानुष खून केला. सुषमा अशोक सनदे जाधव (४५) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत पती अशोक विष्णू सनदे यांनी तक्रार दिली. त्यानुसार संशयित सुनील गणपती जाधव (रा. घुणकी) याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.घटनास्थळ व पोलिसातून मिळालेली माहिती अशी, घुणकी येथील सनदे दाम्पत्य हे शेती करतात. सनदे यांचे दोन ट्रॅक्टर आहेत, तर त्यांची पत्नी सुषमा सनदे कुटुंबास मदतीसाठी घरातील जनावरे चरायला घेऊन जात होत्या. नेहमीप्रमाणे सुनीता या गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गावच्या उत्तरेस वारणा नदीच्या बाजूला असलेल्या सुधीर आप्पासाहेब मगदुम यांच्या ‘डाग’ नावाच्या शेताजवळ जनावरे चरावयास घेऊन गेल्या होत्या. त्या घरी परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी शोध घेतला. दरम्यान, आज शुक्रवारी (दि. २७) सकाळी सुषमा यांचा मृतदेह सुधीर अण्णासाहेब मगदूम यांच्या उसाच्या शेतात आढळला.वडगावचे पोलिस निरीक्षक भैरव तळेकर यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. शेतात मृतदेह असल्याने रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली होती. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंके यांनी घटनास्थळाला भेट दिली. दरम्यान, अशोक विष्णू सनदे यांचा ट्रॅक्टर असून, दोन वर्षांपूर्वी आरोपी सुनील गणपती जाधव हा सनदे यांच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करीत होता. तो सुषमा यांच्याकडे वाईट नजरेने पाहू लागल्याने त्याला कामावरून काढून टाकले होते. तेव्हापासून त्याच्या मनात राग होता. त्या रागापोटी सुनीलने सुषमा यांचा खून केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दुपारी नवे पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सासू असा परिवार आहे. रात्री सुषमा यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संशयितानेच दिला खुनाचा निरोपयातील मुख्य संशयित सुनील जाधव याने सुषमा यांचा मुलगा व वडील यांना फोन करून सुषमा हिला संपवल्याचा निरोप दिला होता. त्यानंतर काल रात्रीपासून त्यांचा व जनावरांचा शोध घेण्यात येत होता. सकाळी बेपत्ता जनावरे सापडल्यानंतर उसाच्या सरीत मृतदेह मिळून आला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस