मंत्री छगन भुजबळांविरोधात कोल्हापुरातील मराठा समाज आक्रमक
By संदीप आडनाईक | Updated: December 19, 2023 18:05 IST2023-12-19T18:03:24+5:302023-12-19T18:05:34+5:30
कोल्हापूर : "एक घास काऊचा, एक घास चिऊचा, छगन बाळा असे नाही वागायचं, हा आवाज मराठ्यांचा, भुजबळांचं करायचं काय? ...

मंत्री छगन भुजबळांविरोधात कोल्हापुरातील मराठा समाज आक्रमक
कोल्हापूर : "एक घास काऊचा, एक घास चिऊचा, छगन बाळा असे नाही वागायचं, हा आवाज मराठ्यांचा, भुजबळांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय," अशा घोषणा देत सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी मंगळवारी दसरा चौक परिसरात मंत्री छगन भुजबळ यांचा निषेध केला.
भिवंडी-ठाणे येथे ओबीसी निर्धार मेळाव्यात रविवारी मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी विरोधात बोलणाऱ्यांचा निवडणूकीत कार्यक्रम करावा असे वक्तव्य केले, त्यामुळे संतप्त सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गेले ५२ दिवस ज्या ऐतिहासिक दसरा चौकातील ज्या मंडपामध्ये धरणे आंदोलन सुरू आहे, तेथे आंदोलन केले.
महिला कार्यकर्त्या व रिक्षा संघटनेच्या सदस्यांनी तसेच महाराष्ट्र गर्व्हमेंट नर्सिंग असोसिएशन, कोल्हापूर यांच्या पदाधिकाऱ्यांनी भुजबळांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, अशा घोषणा देत तीव्र निषेध नोंदवला. यावेळी सकल मराठा समाजाचे ॲड. बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, वसंतराव मुळीक, विजय देवणे, अमित अतिग्रे, प्रा. अनिल घाटगे, ॲड. सुरेश कुन्हाडे, दिलीप देसाई, सुभाष जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.