शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

कोल्हापुरात सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या पिस्तुलातून हवेत गोळीबार, मोलकरणीच्या मुलाचा प्रताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 11:37 IST

युट्यूबवर आणि सिनेमात पाहून शिकला

गोकुळ शिरगाव : उजळाईवाडी (ता. करवीर) येथील पसरिचानगरमध्ये एका सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या घरात मोलकरणीच्या अल्पवयीन मुलाने पिस्तूल चोरून हवेत आणि घराच्या भिंतीवर गोळ्या झाडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.याबाबत अधिक माहिती अशी, पसरिचानगरमध्ये सेवानिवृत्त पोलिस अधिकारी महावीर भाऊ सकळे हे अनेक वर्षांपासून राहतात. सकळे यांनी ५१,४०० रुपये किमतीची मेड इन जर्मनी ३२ बोअर आर्मिनिअस जिवंत राउंड लोड असलेली रिव्हॉल्व्हर कपाटात ठेवली होती. कपाटाच्या ड्रॉवरला लॉक न करता ड्रॉवर उघड्या स्थितीत होते. मोलकरणीच्या अल्पवयीन मुलाने पिस्तूल चोरून शुक्रवारी भर दुपारी घराच्या भिंतीवर दोन बार काढले. अवतीभवती लाऊड स्पीकर व गोंगाट असल्याने हा आवाज नागरिकांच्या लक्षात आला नाही. त्यानंतर त्याने आपल्या मित्राला घेऊन माळावर जाऊन हवेत बार उडवले. या घटनेची फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गांधीनगर येथे मोलकरणीच्या घरी जाऊन चौकशी केली असता बंदूक चोरल्याचे सांगितले. तो अल्पवयीन मुलगा आणि त्याचा तेरा वर्षांच्या मित्राने मणेरमळा या ठिकाणी मोकळ्या माळावर जाऊन हवेत व आंब्याच्या झाडावर बार उडवले. त्यानंतर त्या मुलाने बंदूक एका बोळात टाकली. त्या दोघांनी एकूण ३७ राउंड उडवले. त्या मुलाने बंदुकीसोबत ड्रोनदेखील चोरला होता. आईला घरकामाला मदत म्हणून कधी कधी तो जात होता. आपल्या मुलाने पिस्तूल चोरल्याचे मोलकरणीला माहीत नव्हते. साहेबांची खोली साफ करण्याच्या उद्देशाने त्यांच्या बेडरूममध्ये जाऊन ड्रॉवर उघडा दिसल्याचा पाहून त्याने बंदूक खिशात घातली. गोकुळ शिरगाव पोलिसांनी अवघ्या तीन तासांत पिस्तूल, पुंगळ्या, ड्रोन हस्तगत केले. बंदूक चालवायला कशी शिकलास, असे विचारल्यावर चित्रपटामध्ये बघून शिकलो असल्याचे त्याने सांगितले.

दिवसभर गल्लीत फायरिंगअवघ्या १३ वर्षांचा मुलगा हातात रिव्हॉल्व्हर घेऊन गल्लीत दिवसभर फटाके उडविल्यासारखा गोळ्या झाडत होता. त्याने ३४ पेक्षा जास्त गोळ्या झाडल्या. एखाद्याला गोळी लागली असती तर अनर्थ घडला असता. भरदिवसा घडलेला हा प्रकार कोणालाच कसा समजला नाही ? याबाबत पोलिसही अचंबित झाले.

युट्यूबवर पाहून शिकलारिव्हॉल्व्हरमधील गोळ्या संपल्यानंतर त्याचे चेंबर उघडून त्याने पुन्हा गोळ्या भरल्या. चोरलेल्या सगळ्या गोळ्या हवेत आणि भिंतीवर उडवून त्याने संपविल्या. लहान वयात याचे ज्ञान त्याला कसे आले, याची चौकशी पोलिसांनी केली. युट्यूबवर आणि सिनेमात पाहून शिकल्याचे त्याने सांगितले.

सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक महावीर भाऊ सकळे यांच्या निष्काळजीपणामुळे एखाद्याचा जीव गेला असता. सुदैवाने दुर्घटना टळली. मात्र, सकळे यांचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवणार आहे. - सुजितकुमार क्षीरसागर, पोेलिस उपअधीक्षक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFiringगोळीबारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस