शहरं
Join us  
Trending Stories
1
"अंबरनाथ, बदलापूरमधून आम्ही तुम्हाला हाकलून दिले, उल्हासनगरमध्ये धनुष्यबाणाचा सुपडासाफ करु"
2
राजकारणातून निवृत्तीच्या चर्चांवर खुद्द नारायण राणेंचे उत्तर, म्हणाले- "जर माझ्या पदाचा..."
3
हिंदूंवरचे अत्याचार बांगलादेशला महागात पडणार! IPL 2026 पाठोपाठ आता 'या' खेळातही NO ENTRY?
4
एक्स बॉयफ्रेंड, थर्टी फर्स्टची भेट अन् घरात मिळाला मृतदेह; अमेरिकेत हत्या झालेली निकिता कोण?
5
एकदा फूल चार्ज केल्यानंतर ४० दिवस चार्जरकडं बघायचं नाही? Oppo A6 Pro 5G भारतात लॉन्च!
6
व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या रडारवर कोण? ट्रम्प यांनी ‘या’ देशाचं नाव घेत दिले स्पष्ट संकेत
7
भाग्यवान! पिठाची गिरणी चालवणाऱ्याचं एका क्षणात फळफळलं नशीब, 'असा' झाला करोडपती
8
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या घरावर हल्ला, खिडक्यांची तोडफोड, एकाला अटक!
9
काय सांगता! भारतात जे काम फ्री होते, त्यासाठीच अमेरिकेत प्रतितास ९ हजार कमावतात लोक
10
राजस्थानच्या सीकर आणि जालोरमध्ये भीषण अपघात; ६ लोकांचा मृत्यू, १४ जण जखमी
11
"युतीसाठी मी ५० मिनिटे भाजपा कार्यालयात ताटकळत बसलो, पण शेवटी..."; प्रताप सरनाईकांचा आरोप
12
५ लाख थकवले, पैसे मागितले की रडतो...; 'मन हे बावरे'च्या निर्मात्यावर शशांकचे आरोप, मंदार देवस्थळींविरोधात कायदेशीर कारवाई करणार
13
वैभव सूर्यवंशीची कॅप्टन्सीत पहिली फिफ्टी! १० उत्तुंग षटकारांसह २८३ च्या स्ट्राईक रेटनं कुटल्या धावा
14
भाजप निवडणूक आयोगाला खिशात घेऊन फिरतंय का? बिनविरोध निवडीवरून नाना पटोलेंचा घणाघात!
15
BRICS नष्ट करण्याची तयारी; अमेरिकेला का हवे 'या' 5 देशांवर नियंत्रण? जाणून घ्या...
16
आंध्र प्रदेशात ONGC पाइपलाइनमधून गॅसगळतीनंतर भीषण आग; परिसरात भीतीचे वातावरण
17
मीरा भाईंदरमध्ये आठवडा होत आला तरीही उमेदवारांची शपथपत्रेच 'अपलोड' केलेली नाहीत
18
‘५ लाख द्या, नाहीतर अश्लील व्हिडीओ व्हायरल करेन’, ड्रायव्हरची मालकिणीला धमकी, त्यानंतर...  
19
नवनीत राणांनी अजित पवारांना दिलेल्या 'त्या' सल्ल्यावर खोडके बरसले; म्हणाले 'औकातीत राहून बोलायला शिका'
20
व्हेनेझुएलावर अचानक हल्ला करून अमेरिकेचा चीन-रशियाला मोठा इशारा; भारतावर काय होणार परिणाम?
Daily Top 2Weekly Top 5

Ichalkaranji Municipal Election 2026: 'शिव-शाहू'च्या उमेदवारांना माघारीसाठी ४० लाखांची ऑफर; शशांक बावचकर यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 13:54 IST

आमदारांना अशी भाषा शोभत नाही

इचलकरंजी : महायुतीकडून शिव-शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यासाठी रोख ४० लाख रुपये, फ्लॅट देण्याचे प्रलोभन दाखवले. मात्र, त्याला आमचा एकही उमेदवार बळी पडला नाही. त्याचबरोबर एका राष्ट्रीय पक्षाच्या माजी आमदारानेही एका उमेदवाराला माघारीसाठी फोन केला, हे त्यांना शोभत नाही, असा आरोप शशांक बावचकर यांनी पत्रकार परिषदेत केला.बावचकर म्हणाले, सत्ता असेल तरच पाणी मिळणार आहे, अशी वल्गना आमदार राहुल आवाडे करीत आहेत. एकप्रकारे ते लोकांच्यात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. केएटीपी व तारदाळजवळ पाणी येते, तर इचलकरंजीला का येऊ शकत नाही? सुरेश हाळवणकर यांनीही सोयीस्कर भूमिका घेतली आहे. वारणा योजनेला कोण विरोध केला, हे हाळवणकर चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. गेल्या दोन दिवसांपासून आघाडीच्या उमेदवारांना विविध प्रकारची आमिषे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांना यश आले नाही. लोकशाही संपविण्याचा प्रयत्न अशा पद्धतीने सुरू आहे.

वाचा : अर्ज माघारीत घोळ झाला, कोल्हापुरात 'या' प्रभागात महायुतीचा अधिकृत उमेदवारच नाही राहिलासागर चाळके म्हणाले, मुख्यमंत्री चौथ्यांदा इचलकरंजीला येत आहेत. अनेकवेळा त्यांनी इचलकरंजीला पाणी देण्याचे आश्वासन दिले. मात्र, ते पाळले नाही. आता पुन्हा एकदा खोटे आश्वासन देण्यासाठी ते येत आहेत. त्याला जनता बळी पडणार नाही.मदन कारंडे म्हणाले, सतेज पाटील यांच्यावर आरोप करणाऱ्यांनी गेल्या २५ वर्षांत इचलकरंजीला पाणी का दिले नाही, हे सांगावे. उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख कोणाच्या संगतीत असतात?, कोणाचे काम करतात, हे तपासावे. पत्रकार परिषदेस भाऊसाहेब कसबे, सदा मलाबादे, रवी गोंदकर, प्रताप पाटील, आदी उपस्थित होते.

आमदारांना अशी भाषा शोभत नाहीआमदार सतेज पाटील यांनी शहराला पाणी देण्याचे छोटे वक्तव्य केले. त्यामुळे आमदार राहुल आवाडे यांच्या बुडाला आग लागली. ते आता त्यांच्यावर एकेरी भाषेत टीका करीत आहेत. ज्येष्ठ नेत्यांबाबत अशी भाषा वापरणे शोभत नाही. टीका करण्यापेक्षा शहराला पाणी द्यावे, असे बावचकर म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Ichalkaranji Election: Candidates Offered Bribes to Withdraw, Claims Shashank Bawachkar

Web Summary : Shashank Bawachkar alleges candidates were offered ₹40 lakh and flats to withdraw from the Ichalkaranji Municipal Election. He criticizes attempts to create fear regarding water supply and accuses a former MLA of pressuring candidates. Promises to provide water were broken, and the public won't fall for false assurances again.
टॅग्स :Ichalkaranji Municipal Corporation Electionइचलकरंजी महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Mahayutiमहायुती